Tomato Rate : सध्या कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव (Tomato Price) मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधव (Onion Grower Farmer) चांगलाच अडचणीत आहे. सध्या कांद्याला मिळत असलेल्या बाजारभावात (Onion Rate) उत्पादन खर्च काढणे देखील मुश्कील असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी पाहायला मिळत आहे.
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पीक पुन्हा एकदा बेभरवशाचे ठरले असून सध्या टोमॅटो (Tomato Crop) या तरकारी पिकाची हवा बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. मित्रांनो सध्या टोमॅटो हे भाजीपाला पीक चांगलाच भाव खात आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) एकीकडे कांद्याला कवडीमोल बाजार भाव मिळत आहे तर दुसरीकडे टोमॅटो पिकाला या हंगामातील सर्वोच्च बाजार भाव (Tomato Market Price) मिळाला आहे.
पिंपळगाव एपीएमसीमध्ये टोमॅटोला 881 रुपये प्रति 20 किलो कॅरेट म्हणजे जवळपास 44 रुपयांहून अधिक बाजारभाव टोमॅटोला मिळाला आहे. यामुळे सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव चांगलेच समाधानी असल्याचे चित्र आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टोमॅटोची आवक अजून कमी झाली तर टोमॅटोच्या बाजार भावात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो सध्या पिंपळगाव एपीएमसीमध्ये कांद्याला 2200 रुपये प्रति क्विंटल ते 2300 रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळत आहे.
शिवाय या बाजार भावात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार बघायलाच मिळत आहे. अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. पिंपळगाव एपीएमसी कांदा लिलावासाठी ओळखली जाते हे खरं असल तरी ती टोमॅटो या पिकाच्या लिलावासाठी देखील महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. दरम्यान हवामान बदलामुळे तसेच पावसाच्या लहरीपणामुळे टोमॅटो पिकावर विपरीत परिणाम झाला असून अनेक ठिकाणी टोमॅटो पिकाची फूलगळ पाहायला मिळाली आहे.
अशा परिस्थितीत बाजारपेठेत टोमॅटोची आवक कमी झाली आणि बाजार भाव चांगलेच वधारले आहेत. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, बुधवारी पिंपळगाव एपीएमसीमध्ये 2 लाख 33 हजार 720 टोमॅटो क्रेट्सची आवक झाली होती. या दिवशी झालेल्या लिलावात 20 किलो प्रति कॅरेटला या हंगामातील सर्वाधिक 881 रुपये भाव मिळाला आहे.
विशेष म्हणजे बुधवारी झालेल्या लिलावात सरासरी 531 तर कमीत कमी 101 रुपये बाजारभाव मिळाला आहे. निश्चितच सध्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे. एवढेच नाही तर जाणकार लोकांच्या मते येत्या काही दिवसात पाऊस पुन्हा झाला तर टोमॅटो पिकाला हजार रुपये कॅरेट पेक्षा अधिक भाव मिळू शकतो.