Tomato Farming: टोमॅटो (Tomato Crop) हे भारतात उत्पादित केले जाणारे प्रमुख भाजीपाला पीक (Vegetable Crop) आहे. टोमॅटो पिकातून शेतकरी बांधव (Farmer) लाखोंची कमाई देखील करत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी बाजार भाव (Tomato Rate) मिळत होता. यामुळे टोमॅटो चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
शिवाय शेतकरी बांधव देखील या पिकाच्या शेतीकडे आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. जाणकार लोकांच्या मते, टोमॅटोची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरेल मात्र, शेतकरी बांधवांनी टोमॅटोच्या नेहमी सुधारित जातींची शेती केली पाहिजे. तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी सुधारित जातींच्या टोमॅटोची (Tomato Variety) शेती केल्यास टोमॅटो पिकावर रोगराईचे सावट कमी होते शिवाय उत्पादनात देखील वाढत होते.
एवढेच नाही तर टोमॅटोच्या काही सुधारित जाती लवकर काढण्यासाठी देखील तयार होतात. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी टोमॅटोच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
टोमॅटोच्या काही प्रगत जाती ज्याची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल
काशी अमूल – टोमॅटोची ही एक उत्तम जात आहे. या जातीचे फळ गोलाकार असतात. या जातीच्या फळाचे सरासरी वजन 90 ते 115 ग्रॅम असते. या जातिची रोपे लावल्यानंतर 80 ते 90 दिवसात फळे फोडण्यासाठी तयार होत असतात. या जातींचे पेरणीसाठी हेक्टरी 400 ग्रॅम बियाणे लागते. त्याच वेळी, ही जात 50 ते 60 टन प्रति हेक्टर उत्पादन देते. ही जात भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जाते.
अर्का सम्राट – ही देखील टोमॅटोची एक जात आहे. ही जात उच्च उत्पन्न देणारी F1 संकरित जात आहे. या जातीची फळे सपाट गोल, मोठी, गडद लाल रंगाची असतात. जाणकार लोकांच्या मते, या जातीच्या फळाचे वजन 90 ते 110 ग्रॅम पर्यंत असते, ही जात ताज्या बाजारासाठी म्हणजे काढणीनंतर लगेच विक्रीसाठी योग्य आहे. ही जात 80 ते 85 टन प्रति हेक्टर उत्पादन देते. या जातीची देखील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत.
पुसा रोहिणी – ही देखील टोमॅटोची एक जात आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी या जातीची देखील मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. जाणकार लोकांच्या मते, या जातीची फळे लाल, गोलाकार, गुळगुळीत आणि मध्यम आकाराची असतात. या जातीच्या टोमॅटो फळाचे वजन 60 ते 70 ग्रॅम असते. ही जात लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी आणि प्रक्रियेसाठी योग्य असल्याचे जाणकार लोकांचे मत आहे. ही जात 41 टन प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन देते. निश्चितच वर नमूद केलेल्या दोन्ही जातींपेक्षा ही जात कमी उत्पन्न देते. मात्र ही जात लांब वाहतुकीसाठी योग्य असल्याने अनेक शेतकरी बांधव या जातीच्या लागवडीस प्राधान्य देत आहेत.