Tomato Farming: मित्रांनो भारतात गेल्या अनेक दशकांपासून भाजीपाला शेती (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. टोमॅटो (Tomato Crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक (Vegetable crop) आहे.
या पिकाची आपल्या भारतात बारमाही शेती (Farming) केली जाते. विशेष म्हणजे टोमॅटो शेतीतून शेतकरी बांधवांना चांगला बक्कळ पैसा (Farmer Income) मिळतं असतो. आज आपण टोमॅटोची पावसाळी हंगामात लागवड पद्धत जाणून घेणार आहोत.
खरं पाहता पावसाळी हंगामात टोमॅटो लागवड केल्यास हिवाळ्यापर्यंत त्याचे उत्पादन मिळू लागते. खरं पाहता ऑगस्ट महिन्यात टोमॅटोची रोपवाटिका (Tomato Nursery) तयार केल्यास सप्टेंबर महिन्यात टोमॅटोची पुनर्लावणी करता येते.
हिवाळी हंगामात टोमॅटो उत्पादित करायचा असेल तर शेतकरी बांधवांना जुलै ते सप्टेंबर त्याकाळात टोमॅटोची शेती करावी लागते. खरे पाहता पावसाळी हंगामात भाजीपाला पीक शेतकऱ्यांना अधिक फायदा देते मात्र या काळात भाजीपाला शेतीची विशेष काळजी देखील घ्यावी लागते.
पावसाळी हंगामात भाजीपाला पिकात अतिवृष्टीमुळे अधिक रोगराईचा धोका वाढतो शिवाय पाणी अधिक झाल्यास पीक सडून नष्ट देखील होते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी टोमॅटो लागवड करताना काही बाबींची पूर्तता करणे अतिशय महत्त्वाचे असते.
अशी तयार करा रोपवाटिका
मित्रांनो पावसाळ्यात टोमॅटोचे पिकं कुजण्याचा धोका सर्वाधिक असतो. या परिस्थितीत टोमॅटोची रोपवाटिका तयार करताना शेतकरी बांधवांनी एक ते दोन फूट उंचीवर बेड तयार करून रोपवाटिका तयार करणे खूपच फायद्याचे ठरते. एक ते दोन फूट उंचीवर बेड तयार केल्यास अतिवृष्टी सारखा पाऊस आला तरीदेखील टोमॅटोची रोपे खराब होत नाहीत.
शेतकरी बांधवांनी सुमारे दीड मीटर रुंदीचे आणि तीन मीटर लांबीचे तसेच आपण आधी बघितलेत याप्रमाणे दीड फूट उंचीचे बेड तयार करावे. या पद्धतीने बेड तयार करून शेतकरी बांधवांनी सुधारित बियाण्याचा वापर करून रोपवाटिका तयार करावी.
जाणकार लोकांच्या मते, टोमॅटोची बियाणं रोपवाटिकेत पेरल्यानंतर सुमारे 40 दिवसांनी पुन्हा लागवड करण्यासाठी रोपे तयार होतात. टोमॅटोची रोपे पुन्हा लागवड करण्यासाठी उपयोगात आणण्याआधी दहा दिवस टोमॅटो रोपांच्या नर्सरीला पाणी देणे थांबवावे. यामुळे टोमॅटोची रोपे निरोगी राहतात.