Tomato Farming: भारतात भाजीपाला पिकांमध्ये (vegetable crop) टोमॅटो पिकाला (Tomato Crop) एक वेगळे स्थान प्राप्त आहे. या पिकाची शेती शेतकरी बांधवांना (Farmer) चांगले उत्पन्न (Farmer income) मिळवून देत असल्याने अलीकडील काही काळात या पिकाची शेती झपाट्याने वाढत आहे.
टोमॅटो पिकाला गेल्या काही महिन्यापूर्वी चांगला समाधान कारक बाजारभाव (Tomato Rate) मिळाला असल्याने या पिकाकडे आता शेतकरी बांधव आपला मोर्चा वळवतील असे जाणकार लोकांचं मत आहे. मात्र असे असले तरी या पिकाचे योग्य व्यवस्थापन (Tomato Crop Management) केले तरच शेतकरी बांधवांना यातून चांगली कमाई होणारं आहे.
खरं पाहता, टोमॅटो पिकावर रोग-राईचे सावट इतर भाजीपाला पिकांप्रमाणे बघायला मिळते. अशा परिस्थितीत टोमॅटो पिकावर येणाऱ्या दोन रोगांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या रोगांवर कशा पद्धतीने नियंत्रण (Tomato Pest Control) मिळवता येऊ शकते या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण बुरशीजन्य रोग तसेच फळकूज रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण करता येईल याविषयी जाणून घेऊया.
टोमॅटो पिकावर येणारा बुरशीजन्य रोग आणि त्यावरील नियंत्रण पद्धत
मित्रांनो टोमॅटो पिकावर विविध रोग येत असतात. यापैकीच एक आहे बुरशीजन्य रोग. जाणकार लोकांच्या मते, हवामान बदलामुळे टोमॅटोच्या रोपांमध्ये बुरशीजन्य रोग नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. त्यामुळे टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. यामुळे उत्पादनात भली मोठी घट होते.
जाणकार लोकांच्या मते, असे रोग आढळल्यास सर्वप्रथम रोपवाटिकेची जागा बदला. तसेच टोमॅटो पिकाच्या पेरणीच्या वेळी 3 ग्रॅम कॅप्टन, थायोफेनेट मिथाइल 45 ग्रॅम आणि पायराक्लोस्ट्रोबिन 5 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून फवारणी करावी. यामुळे अशा रोगांवर प्रतिबंध घातले जातात आणि उत्पादनात भरीव वाढ होते.
टोमॅटो पिकावर येणारा फळ कूज रोग आणि त्यावर नियंत्रण पद्धत
जाणकार लोकांच्या मते, टोमॅटो पिकासाठी फळ कूज रोग अतिशय घातक आहे. टोमॅटोच्या रोपांमध्ये फळ कुजण्याचा रोग होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पिकांवरील रोगाच्या नियंत्रणासाठी पावसाळ्यापूर्वी 25 ग्रॅम सायमोक्सॅनिल-मँकोझेब 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. तसेच ज्या फळांना फळ कुज रोग होतो, ती काढून फेकून द्यावीत. यामुळे इतर फळांना हा रोग लागत नाही. परिणामी उत्पादनात होणारी घट कमी करता येते. निश्चितच यामुळे शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढते.
मित्रांनो आम्ही इथे दिलेली माहिती ही अंतिम राहणार नाही. यामुळे कोणत्याही पिकासाठी कोणतीही फवारणी करण्या अगोदर शेतकरी बांधवानी तज्ञ लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.