Tomato Farming : टोमॅटो हे एक भाजीपाला पीक आहे. याची गणना प्रमुख भाजीपाला पिकात होते, याला बाजारात मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे याची शेती बारा महिने केली जाऊ शकते. अशा परिस्थिती हे पीक शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
दरम्यान जाणकार लोक या पिकाच्या शेतीतून अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी या पिकाच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला देतात. यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी टोमॅटोच्या सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर
पुसा रोहिणी – टोमॅटोची एक सुधारित जात आहे. या जातीची फळे लाल आणि गोलाकार असतात. तसेच गुळगुळीत आणि मध्यम आकाराची फळे असल्याने बाजारात कायमच मागणी असते. फळांचे वजन हे जवळपास ६० ते ७० ग्रॅम दरम्यान असते. ही जात लांब अंतरावरील वाहतूक आणि प्रक्रियेसाठी योग्य आहे. कृषी तज्ञ असा दावा करतात की, ही जात 41 टन प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असते.
पुसा सदाबहार – ही देखील टोमॅटोचीं प्रगत जात म्हणून ओळखली जाते. ही जात शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या जातीची फळे ही लाल, गोलाकार आणि आकाराने लहान असतात. यासोबतच या जातीची फळे गुळगुळीत आणि आकर्षक देखील असतात. यामुळे बाजारात याला चांगला दर मिळतो. ही जात 25 ते 35 टन प्रति हेक्टर उत्पादन देत असल्याचा दावा केला जातो.
पुसा उपहार – वर नमूद केलेल्या दोन जातीप्रमाणेच ही देखील जात शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ही टोमॅटोचीं प्रगत जात आहे. या जातीची टोमॅटो आकर्षक गोलाकार, मध्यम आकाराची असतात. टोमॅटोच्या या जातीची फळे गुच्छांमध्ये वाढतात. प्रत्येक घडामध्ये ४ ते ६ फळे येतात. ही जात 37 टन प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन देत असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे.
निश्चितच या जातीची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार नाही. दरम्यान शेतकरी बांधवांनी टोमॅटोच्या जातीची निवड करण्या अगोदर आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा तसेच तज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा. शेतकऱ्यांनी आपल्या हवामानाला मानवेल अशा जातीची निवड करणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे.