Tomato Farming : भारतात अलीकडे शेतकरी बांधव (Farmer) अल्प कालावधीत आणि कमी खर्चात काढण्यासाठी तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांची (Vegetable Crops) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. टोमॅटो (Tomato Crop) हे देखील प्रमुख भाजीपाला पिक आहे.
टोमॅटो पिकाची लागवड संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यात देखील टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अलीकडे आपल्या देशातील शेतकरी बांधव चेरी टोमॅटोची शेती (Cherry Tomato Farming) करू लागले आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील चेरी टोमॅटोची शेती करू लागले आहेत.
विशेष म्हणजे चेरी टोमॅटो मध्ये अधिक औषधी गुणधर्म आढळत असल्याने ह्याला बाजारात मोठी मागणी असते. परिणामी याची शेती शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न (Farmer Income) मिळवून देत आहे.
अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी चेरी टोमॅटोच्या एका सुधारित जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण चेरी टोमॅटोची हायब्रीड जात (Tomato Variety) वीटी 95 या जाती विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
चेरी टोमॅटोची हायब्रीड जात विटी 95 विशेषता
मित्रांनो चेरी टोमॅटोची ही हायब्रीड जात वीपीकेएएस, अल्मोड़ा येथे 2019 मध्ये विकसित करण्यात आली आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, चेरी टोमॅटोच्या या हायब्रीड जातीची फळ अंडाकृती, टणक, उच्च टीएसएस (6-7.0 ओब्रिक्स) आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात.
या जातीची चेरी टोमॅटो अडीचशे ते तीनशे क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देण्यास सक्षम असतात. या जातीचे पेरणी खरीप आणि रब्बी हंगामात केली जाऊ शकते. या जातीच्या पेरणीसाठी हेक्टरी 400 ग्रॅम बियाणे आवश्यक असतं.
जाणकार लोकांच्या मते, या जातीची लागवड पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये केली जाऊ शकते. निश्चितच महाराष्ट्रात देखील या जातीची लागवड शक्य असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना या जातीचा फायदा होणार आहे.