Tomato Farming : टोमॅटो हे एक प्रमुख फळ भाजीपाला पीक आहे. याची महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये लागवड केली जाते. टोमॅटो बारा महिने उत्पादित केले जाऊ शकते. टोमॅटोला बाराही महिने बाजारात मागणी असते. पावसाळ्यात म्हणजेच खरीप हंगामात देखील याची लागवड करता येणे शक्य आहे. दरम्यान आज आपण टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
पावसाळी काळात उत्पादित करता येणाऱ्या टोमॅटोच्या काही प्रमुख जातींची आज आपण माहिती पाहणार आहोत. ज्या शेतकऱ्यांना जुलै महिन्यात टोमॅटोची लागवड करायची असेल ते शेतकरी बांधव या जातीच्या टोमॅटोची लागवड करून चांगली कमाई करू शकणार आहेत.
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्यात टोमॅटो लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळते. पण पावसाळी काळ असल्याने यावेळी याची लागवड केल्यास पीक व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागते.
पिकाची योग्य काळजी घेतली तर या हंगामातून शेतकऱ्यांना टोमॅटो पिकातून नक्कीच चांगली कमाई होणार आहे. तथापि जुलै महिन्यात टोमॅटो लागवड करायची असेल तर याच्या सुधारित वाणांची निवड करणे आवश्यक असते.
अशा परिस्थितीत आज आपण जुलै महिन्यात उत्पादित केल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या पाच सुधारित जातींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
टोमॅटोच्या पाच प्रमुख जाती कोणत्या
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळत असतानाही शेतकरी टोमॅटोची लागवड कमी करतात. कारण की पावसाळ्याच्या सीझनमध्ये टोमॅटोचे पीक अनिश्चित बनते.
म्हणजे एखाद्या वेळी पावसाळ्यात या पिकातून चांगले उत्पादन मिळते तर एखाद्या वेळी अपेक्षित उत्पादन मिळत नाही. पावसामुळे या काळात टोमॅटोचे पीक वाचवणे थोडे कठीण असते. या काळात या पिकाची लागवड केल्यास अधिकच उत्पादन खर्च करावा लागतो.
औषध फवारणींवर अतिरिक्त खर्च होतो. पण टोमॅटोच्या काही अशा जाती आहेत ज्या पावसाळ्यात लावल्यास शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळू शकते. विशेष म्हणजे या जातीसाठी लागणारा उत्पादन खर्च हा इतर जातींच्या तुलनेत कमी राहतो.
हायब्रिड-12, सिंथेटिक-1, पीटी-12, रितू, आर-721, पुसा रत्न या टोमॅटोच्या अशा जाती आहेत ज्या की पावसाळ्यात देखील उत्पादित केल्या जाऊ शकतात. या वाणांची उत्पादन क्षमता, रोग प्रतिकारशक्ती ही इतर जातींच्या तुलनेत खूपच अधिक आहे.
यामुळे यासाठी इतर जातींच्या तुलनेत पावसाळ्यात चांगली उत्पादन देण्यास सक्षम आहेत. मात्र असे असले तरी कोणत्याही जातीची निवड करणे अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे.