Tirupati Sainagar Shirdi Special Train : तिरुपती आणि शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.
यासोबतच तिरुपती येथे देखील वेंकटचलपति, श्रीनिवासू, श्रीवारी भगवान तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे.
दरम्यान शिर्डीहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी आणि तिरुपती येथून शिर्डीला येणाऱ्या भाविकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे तिरुपती ते साईनगर शिर्डी दरम्यान सुरू झालेल्या साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेनला आता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही साप्ताहिक विशेष गाडी 26 नोव्हेंबर 2023 पर्यंतचं चालवली जाणार होती.
मात्र आता या गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला असून ही गाडी आता 28 जानेवारी 2024 पर्यंत धावणार आहे. या गाडीला दोन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे.
यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून साईनगर शिर्डी येथील साईबाबांचे आणि तिरुपती बालाजी येथे भगवान बालाजीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांचे दर्शन अधिक सुखकर होणार आहे.
या गाडीला २१ डबे आहेत. यामध्ये एक डब्बा एसी २ टीयरचा आहे, 2 डब्बे एसी ३ टीयरचे आहेत, १४ स्लीपर क्लास डब्बे आहेत आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी डब्बे आहेत तसेच २ गार्ड ब्रेक वैन डब्बे आहेत.
विशेष म्हणजे या गाडीच्या वेळापत्रकात आणि रूट मध्ये कोणताच बदल झालेला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले आहे.
म्हणजेच 26 नोव्हेंबर पर्यंत ज्या मार्गाने ही गाडी चालवली जात होते त्याच मार्गाने पुढेही गाडी चालवले जाणार आहे.
एकंदरीत या विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ दिली असल्याने भगवान बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला जाणाऱ्या आणि साईनगर शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे भाविकांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.