Farmer succes story : देशात पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) फार पूर्वीपासून अगदी शेतीच्या सुरुवातीपासून केला जात असल्याचे सांगितले जाते.
आता यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता पशुपालन व्यवसाय व्यावसायिक स्तरावर केला जाऊ लागला आहे. सुरुवातीला पशुपालन व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Business) म्हणून केला जात असते मात्र आता पशुपालन व्यवसाय हळूहळू प्राथमिक व्यवसायाची जागा घेऊ लागला आहे.
यातून पशुपालक शेतकऱ्यांना (Livestock Farmer) चांगला लाभ देखील मिळत आहे. अलीकडे या व्यवसायात महिला पशुपालक शेतकऱ्यांनी देखील उडी घेतली आहे.
विशेष म्हणजे महिला शेतकरी देखील या व्यवसायातून चांगली बक्कळ कमाई करत आहेत. अशीच एक महिला पशुपालक शेतकरी आहे गुजरात राज्यातील.
गुजरात राज्यातील (Gujrat) बनासकांठा येथे राहणारी 62 वर्षीय पशुपालक शेतकरी नवलबेन चौधरी यांनी पशुपालन व्यवसायतुन वार्षिक एक कोटी रुपये उलाढाल करण्याची किमया साधली आहे.
महिला पशुपालक शेतकऱ्याविषयी अल्पशी माहिती मित्रांनो नवलबेन चौधरी आपले शेजारील राष्ट्र गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्याच्या मौजे नागाना गावात राहतात.
इतर महिला शेतकऱ्यांप्रमाणे शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. महिला शेतकरी नवलबेन यांना शिकता आले नाही पण त्यांच्या मध्ये पैसे कमवण्याची इच्छा ही इतरांपेक्षा जास्त आहे. यामुळे अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी या महिला शेतकऱ्याने पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला.
पशुपालन व्यवसाय कसा सुरू केला मित्रांनो नवलबेन यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, 8-10 जनावरे घेऊन त्यांनी पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला.
यानंतर हळूहळू त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि मेहनतीला योग्य नियोजनाची सांगड घालून हा व्यवसाय पुढे नेला आणि आजच्या काळात ही महिला आशियातील सर्वात मोठ्या ‘बनास डेअरी’मध्ये आपल्या पशुचे दूध उत्पादन विकून चांगले बक्कळ पैसे कमवत आहे.
नवलबेन पशुपालन व्यवसायतुन कोटींची कमाई करत आहेत. यामुळे आजच्या काळात ही महिला शेतकरी सर्व महिलांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या असून इतर पशुपालक शेतकऱ्यांसाठी देखील आदर्श ठरत आहेत.
250 पशु आहेत गोठ्यात नवलबेन यांच्या मते ‘बनास डेअरी’मध्ये त्या दररोज सुमारे 1 हजार लिटर दूध गोळा करून विकतात. यामुळे त्यांची वार्षिक 1 कोटींची उलाढाल होत आहे. गेल्या एक वर्षापासून त्या हे काम करत आहेत.
या एक वर्षाच्या कालावधीत नवल बेन यांनी पशुपालन व्यवसायतुन सुमारे 1 कोटी 10 लाख रुपये कमावले आहेत. एवढेच नाही आजच्या घडीला या महिला शेतकऱ्याकडे 250 पशु देखील आहेत.
निश्चितच महिला शेतकऱ्याने मिळवलेले हे यश नेत्रदीपक आहे, यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळत आहे.
प्राण्यांची योग्य काळजी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही महिला शेतकरी स्वतः त्यांच्या जनावरांसाठी चारा कापते, तसेच त्या स्वतः त्यांच्या जनावरांसाठी स्वच्छ जागेची देखील व्यवस्था करतात. यासोबतच या महिला शेतकरी आपल्या प्राण्यांची उत्तम काळजी घेतात.