Thane News : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा 19 जानेवार चा मुहूर्त हुकला होता यामुळे ही ट्रेन मार्चमध्येचं सुरू होईल असे वाटतं होत. परंतु ही ट्रेन 10 फेब्रुवारीलाच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली. यामुळे मुंबईहून पुणे आणि सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
मात्र, रोजाना सात ते आठ लाख प्रवासी ज्या ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करत असतात त्या रेल्वेस्थानकावर मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनचा थांबा नाही. यामुळे, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी यांना इमेल पाठवला आहे.
खासदार महोदय यांनी या ईमेलमध्ये मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन ला ठाणे रेल्वे स्टेशनवर थांबा दिला पाहिजे अशी मागणी केली. तसेच या ईमेलमध्ये त्यांनी ठाण्यात वंदे भारतला थांबा दिला नसल्याने खेद देखील व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन ला दौंड या ठिकाणी थांबा देण्याची मागणी केली आहे.
यामुळे वंदे भारत ट्रेनची गती पाहता सर्वच ठिकाणी थांबा देता येणे शक्य होईल का हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. खरं पाहता ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी पुढाकार घेत ठाणे रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ठाणे हे राज्यातील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून या ठिकाणी अनेक लांब पल्ल्याच्या गाडयांना थांबा आहे.
परिणामी नवी मुंबई तसेच ठाण्यामधून लाखो प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशन वरून लांब पल्ल्याच्या गाड्या गाठत असतात. येथून रोजाना सात लाखाहून अधिक प्रवासी येजा करतात. अशा परिस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकाला महत्त्व आहे. या रेल्वे स्थानकावर सोलापूरकडेही जाणारे अनेक प्रवासी असतात. यामुळे या ठिकाणी थांबा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या स्थितीला ही रेल्वे मुंबईहून सुटून थेट कल्याणला थांबणार आहे.
यामुळे ठाणे, नवी मुंबई येथील प्रवाशांना जर सोलापूर गाठायचं असेल तर कल्याण येथून वंदे भारत पकडावी लागणार आहे. मित्रांनो जर आपणास मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत इत्यंभूत माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Vande Bharat Express Timetable : सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत ट्रेनचे नवीन वेळापत्रक जाहीर; पहा…..