Thane Highway News : मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेतली जात आहेत.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देखील एमएमआरडीएने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये ठाणे खाडीकिनारी रस्ता मार्गाचा देखील समावेश आहे. हा प्रकल्प ठाणेकरांच्या दृष्टीने अति महत्त्वाचा असून यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी बहुतांशी कमी होईल असा दावा तज्ञांनी देखील केला आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ; पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा !
दरम्यान आता या प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. बाळकुम – गायमुख ठाणे खाडी किनारा रस्ता (मार्ग) हा प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून विकसित होत असून याच प्रकल्पाच्या खर्चात आता दुपटीने वाढ झाली असून याबाबतचा प्रस्ताव एमएमआरडीएच्या बैठकीत मंजूर झाला आहे. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केला जाईल असा असा आशावाद व्यक्त होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रकल्पासाठी सुरवातीला १३१६.१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता मात्र हा खर्च थेट २६७४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच खर्चात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. दरम्यान आता आपण हा प्रकल्प नेमका कसा राहणार आहे याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ भागातील वाहतूक तब्बल 21 एप्रिल पर्यंत राहणार बंद, पहा सविस्तर
असा असेल हा मार्ग
हा बाळकुम – गायमुख ठाणे खाडी किनारा रस्ता (मार्ग) एकूण १३.१४ किमी लांबीचा सागरी रस्ता राहणार आहे. या रस्त्यात एकूण सहा लेन राहणार आहेत. याची रुंदी अंदाजे 45 मीटर एवढी राहील. यासाठी आता आधारित अहवालानुसार 2674 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग बाळकुमजवळील खारेगाव येथून सुरू होणार आहे. तसेच हा खाडीकिनारी मार्ग घोडबंदर रस्त्यावरील गायमुख येथे संपणार आहे.
हा मार्ग बाळकुम, कोलशेत, वाघबीळ, ओवळा, कासारवडवली, मोघरपाडा येथून प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी बहुतांशी फुटेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. या प्रकल्पांतर्गत एक उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग, 3 किमीचा स्टील्ट रस्ता बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! एप्रिल महिन्यात ‘या’ रूटवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन; किती असेल तिकीट, कसा असेल रूट, पहा….