Thane Borivali Tunnel : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या महामार्गांची आणि रस्ते विकासाची कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच इतर स्थानिक प्राधिकरणाने हाती घेतली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था अजूनच मजबूत होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने देखील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी एक महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. सदर प्राधिकरणाने ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाचा प्रकल्प हाती घेतला असून आता याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सदर प्रकल्पासाठी बांधकामाच्या निविदा जारी केल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. खरं पाहता गेल्या सात वर्षांपासून हा प्रोजेक्ट रखडला आहे. सुरुवातीला हा प्रोजेक्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा शासनाचा मानस होता.
मात्र तदनंतर 2021 मध्ये शासनाने हा प्रोजेक्ट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सुपूर्द केला. या प्राधिकरणाकडे हा प्रोजेक्ट आल्यानंतर लगेचच मात्र यावर काम होऊ शकलं नाही. हा ठाणे बोरिवली भूमिगत मार्ग जंगलातून जातो यामुळे वन्यजीवांना धोका पोहोचू नये यासाठी शासनाने एमएमआरडीएला नवीन अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. यामुळे हा प्रोजेक्ट एम एम आर डी ए कडे आल्यानंतरही रखडला असल्याचे जाणकारांनी सांगितले.
मात्र आता प्राधिकरणाकडून या प्रकल्पासाठी बांधकामाच्या निविदा जारी केल्या आहेत. यामुळे हा प्रोजेक्ट आता लवकरच मार्गी लागणार आहे. 11.8 किलोमीटरच्या भूमिगत मार्ग आणि यातील 10.25 किलोमीटर लांबीच्या दोन बोगद्यांसाठी 2 निविदा मागवण्यात आल्या आहेत.
निविदा प्रक्रिया पुढील चार महिन्यात कम्प्लीट करून पावसाळ्यात या प्रोजेक्टचे बांधकाम सुरू करण्याचा मानस असल्याचे प्राधिकरणाकडून सांगितले गेले आहे. निश्चितच गेल्या सात वर्षांपासून रेंगाळलेला हा महत्त्वपूर्ण असा प्रोजेक्ट आता मार्गी लागला असून आता या प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
आम्ही आपले माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, ठाणे – बोरिवली दरम्यान सद्यस्थितीला प्रवास करण्यासाठी दीड तासांचा कालावधी लागतो. अधिक वाहतूक कोंडी असली तर मग 2 तासांचा ही वेळ प्रवाशांना लागत असतो. यामुळेच या दोन शहरातील प्रवास सुखकर करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
सुरुवातीला हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे होता. मात्र रस्ते विकास विभागाकडे या प्रकल्पाला गती लाभले नसल्याने 2021 मध्ये हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला असून आता यासाठी बांधकामाच्या निविदा जारी झाल्या आहेत आणि लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
हा भूमीगत मार्ग ११.८ किमी लांब असून मार्गात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मार्गावरील दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. बोगद्यात सहा मार्गिका राहतील म्हणजे येण्यासाठी तीन अन जाण्यासाठी तीन मार्गिका प्रस्तावित आहेत.
या प्रकल्पासाठी जवळपास ११,२३५.४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुढील पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे. भूमिगत मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या वीस मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे. निश्चितच या प्रोजेक्टमुळे ठाणे बोरिवली दरम्यान प्रवास करताना होणारी वाहतूक कोंडी फोडण्यास मदत मिळणार आहे.