Sweet Potato Farming: मित्रांनो भारतात मोठ्या प्रमाणात रूट भाज्यांची शेती (Farming) केली जाते. आपल्या राज्यात (Maharashtra) देखील याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. विशेषतः बटाटा, गाजर, मुळा, आले, रताळे, यमिकंद या भाज्यांची शेती (Vegetable Farming) आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय आहे.
याची मागणी बाजारात कायम असल्याने याची शेती शेतकऱ्यांना लाखों रुपयांची कमाई करून देत आहे. रताळ्याबद्दल (Sweet Potato Crop) सांगायचे झाले तर, त्यात असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यासह अनेक गुणधर्म आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत. यामुळे या पिकाची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.
अशा परिस्थितीत या पिकाची शेती शेतकरी बांधवांना (Farmer) लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) कमवून देण्याचे शास्वत साधन बनत आहेत. जाणकार लोकांच्या मते, यामध्ये असलेले औषधी गुणधर्म पाहता पाऊस पडल्यानंतर रताळ्याला बाजारात मोठी मागणी असते.
गोड चव आणि मातीच्या सुगंधामुळे, शहरांमध्ये लोक ते मोठ्या आवडीने खातात, त्यामुळे शेतकर्यांनाही दर्जेदार उत्पादन देणे ही मोठी जबाबदारी बनते. अशा परिस्थितीत आज आपण रताळ्याची शास्त्रीय शेती कशा पद्धतीने केली जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.
रताळे लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा बरं..!
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, रताळे हे एक मुख्य कंद पीक आहे. या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीतून पोषण मिळते. हे पिकं जमिनीच्या आत उगते यामुळे त्याची लागवड करताना, खतांचा चांगला वापर केला पाहिजे. खतांचा चांगला वापर केल्यास या पिकातून चांगले उत्पादन मिळते.
जमिनीतील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने सेंद्रिय पद्धतीचा किंवा रासायनिक खतांचाही वापर करता येतो.
संतुलित प्रमाणात पोषक आणि खत-खते वापरल्याने जमिनीची सुपीकता वाढते आणि रताळ्याचे चांगले उत्पादन मिळते.
त्याच्या पेरणीसाठी केवळ चांगल्या प्रतीचे कंद वापरावेत. कंद लावण्यापूर्वी बीजप्रक्रिया करण्याचीही शिफारस केली जाते.
रताळे पिकासाठी पोषण व्यवस्थापन
कृषी तज्ज्ञ नेहमी शिफारस करतात की पिकामध्ये पोषण व्यवस्थापन हे पीक आणि मातीमध्ये संतुलित प्रमाणात केले पाहिजे. आता मातीला लागणारे खत-बी-बियाणांच्या प्रमाणासाठी माती परीक्षण करून घेण्याचाही सल्ला दिला जातो.
रताळ्याच्या पेरणीसाठी, माती व्यवस्थित कोरडे झाल्यानंतर लावणी करावी. कंद लावण्यापूर्वी शेत तयार करताना नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरसचा संतुलित प्रमाणात वापर करा.
रताळ्याचे उत्पादन वाढवण्यात वर्मी कंपोस्ट खतापासून ते शेणाच्या साध्या सेंद्रिय खतापर्यंत आणि संतुलित प्रमाणात रासायनिक खते महत्त्वाची भूमिका बजावतात.
सुमारे एक हेक्टर जमिनीत रताळे पिकवण्यासाठी 20-25 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडुळ खत वापरणे फायदेशीर ठरते.
हे लक्षात ठेवा की लागवड करण्यापूर्वी, शेतात जास्त नत्र वापरू नका, परंतु त्याऐवजी कमी नायट्रोजन खत द्या.
सेंद्रिय खतांशिवाय किमान 40 किलो नायट्रोजन, 60 किलो पालाश आणि सुमारे 70 किलो स्फुरद देखील शेतात माती परीक्षणाच्या आधारे नांगरणीनंतर द्यावे.
रताळ्याच्या उगवणानंतर, पिकाला रोपांच्या विकासाच्या अवस्थेतही चांगले सिंचन आणि खत आवश्यक असतात.
अशा परिस्थितीत प्रति हेक्टरी 40 किलो युरिया पिकात मिसळल्यास झाडांची वाढ जलद होते आणि फळांचेही चांगले उत्पादन घेता येते.