Suryaful Lagwad : येत्या काही दिवसांनी रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या पावसाळी काळात चांगला दमदार पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून अजूनही मान्सून माघारी फिरलेला नाही.
ऑक्टोबरच्या या पहिल्या पंधरवड्यातही अनेक भागात दमदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे रब्बी हंगामातील पीक लागवडीतून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळेल अशी आशा बळावली आहे.
दरम्यान जर तुम्हीही यंदाचा रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण सूर्यफुलाच्या टॉप तीन जातींची माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर यावर्षी पाऊस मान चांगला झाला असल्याने सूर्यफूल पिकातून शेतकऱ्यांना नक्कीच चांगली उत्पादन मिळणार आहे.
सूर्यफूल हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. याची लागवड ही राज्यातील काही भागांमध्ये आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात होते. त्यासोबतच मुख्य पीक म्हणूनही सूर्यफुलाची शेती केली जाते.
सूर्यफुलाच्या प्रमुख जाती आणि त्यांच्या विशेषता
एल.एस.एफ.एच.-१७१ : सूर्यफुलाचे ही एक प्रमुख संकरित जात आहे. ही जात 90 ते 95 दिवसात हार्वेस्टिंग साठी रेडी होते. या जातीपासून 18 ते 22 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते. ही सूर्यफुलाची सर्वाधिक उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते. राज्यातील अनेक प्रमुख सूर्यफूल उत्पादक जिल्ह्यांमध्ये या जातीची लागवड केली जाते.
ही जात सूर्यफूल पिकावर येणाऱ्या केवडा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला असून आपल्या महाराष्ट्रासोबतच या जातीची लागवड आंध्र प्रदेश राज्यातही मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिली आहे.
पी.डी.के.व्ही.एस.एच.९५२ : सूर्यफूल पिकाची ही एक संकरित जात आहे. सूर्यफुलाचा हा हायब्रीड वाण अवघ्या 90 ते 95 दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे.
या जातीपासून हेक्टरी 18-20 क्विंटल एवढे उत्पादन मिळणार असा दावा केला जात आहे. ही जात राज्यातील फक्त विदर्भ विभागासाठी शिफारस करण्यात आली आहे. हा मध्यम कालावधीचा वाण आहे.
एल.एस.एफ.एच.-३५ (मारुती) : सूर्यफूलचा हा वाण 90 ते 95 दिवसांत परिपक्व होतो. या जातीपासून हेक्टरी 16-19 क्विंटल एवढे उत्पादन मिळतं असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा वाण अधिक उत्पादन देणारा अन राज्यात लागवडीसाठी उपयुक्त आहे. केवडा रोगास हा वाण प्रतिकारक आहे.