Summer Groundnut Variety : भारतात तेलबिया पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी, भुईमूग अशा विविध तेलबिया पिकांचे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सोयाबीनच्या बाबतीत आपल्या राज्याचा मध्यप्रदेश सोडता कोणीच हात धरू शकत नाही. सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर येते. एमपी च्या पाठोपाठ आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो.
भुईमुगाची देखील आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड होते मात्र अलीकडे भुईमूग लागवड कमी झाली आहे. इतर तेलबिया पिकांच्या लागवडीमुळे भुईमूग लागवडीवर परिणाम झाला आहे. पण असे असले तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते आणि त्या उन्हाळी हंगामामध्ये देखील भुईमुगाची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आज आपण उन्हाळी हंगामातून जर भुईमुगाच्या शेतीमधून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी कोणत्या जातींची निवड करायला हवी जेणेकरून त्यांच्या उत्पादनात वाढ होईल याबाबत कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीविषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात भुईमुगाच्या उन्हाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असणाऱ्या टॉप 3 जाती आणि त्यांच्या काही प्रमुख विशेषता.
भुईमूगाच्या उन्हाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त जाती
टीएजी-२४ : भुईमुगाच हे एक महत्वाच वाण आहे. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार टीएजी-२४ हे वाण खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी योग्य मानल जात. उन्हाळी हंगामात जर या वाणाची लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांनी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या एका महिन्याच्या काळात याची लागवड करायला काही हरकत नाही.
उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी हा एका महिन्याचा काळ सर्वोत्कृष्ट ठरतो आणि या वाणाची या कालावधीत लागवड केली तर नक्कीचं शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे. हे वाण ११० ते ११५ दिवसात तयार होत. हेक्टरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळत.
टीजी-२६ : टीएजी-२४ या जाती प्रमाणेच हा वाण देखील खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी योग्य आहे. भुईमुगाच हे वाण देखील ११० ते ११५ दिवसात तयार होत. जर तुम्हाला उन्हाळी हंगामात याची लागवड करायची असेल तर तुम्ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात याची पेरणी करू शकता.
हा एका महिन्याचा काळ उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी उत्कृष्ट असतो. या काळात जर तुम्ही या जातीची लागवड केली तर तुम्हाला हेक्टरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळु शकत.
टीपीजी-४९ : उन्हाळी हंगामात भुईमूग लागवड करायची असेल आणि टीपीजी-४९ या वाणाचा विषय निघणार नाही असे होऊचं शकत नाही. भुईमुगाच हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा वाण आहे.
टीपीजी-४९ हे वाण १२५ ते १३० दिवसात तयार होतं. उन्हाळी हंगामात लागवड करायची असेल तर 15 जानेवारी नंतर लागवड करावी असा सल्ला कृषी तज्ञ देतात. या वाणाचे दाणे हे जाड असतात. हेक्टरी २५ ते ३० क्विंटल इतकं उत्पादन देण्याची या जातीमध्ये क्षमता आहे.