Sugarcane Variety : ऊस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. याची राज्यासहित संपूर्ण देशात कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते. खरंतर ऊस हे एक नगदी पीक आहे. परंतु या पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी याच्या सुधारित वाणाची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो.
अशा परिस्थितीत, आज आपण उसाच्या टॉप 5 सुधारित जाती कोणत्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
उसाच्या टॉप 5 सुधारित जाती कोणत्या
COLK-15201 ऊस वाण : ही उसाची एक लोकप्रिय जात आहे. भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनौ यांनी विकसित केलेली ही एक उसाची सुधारित जात आहे. ऊसाच्या या जातीला इक्षू-11 असेही म्हणतात.
त्याच्या उसाची लांबी खूप अधिक आहे. विशेष म्हणजे या जातीच्या उसाला इतर जातींच्या तुलनेत अधिक फुटवे फुटतात. या जातीपासून चांगले विक्रमी उत्पादन मिळते.
COPB-95 उसाची सुधारित जात : ही पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेली उसाची एक मुख्य जात आहे. या जातीचा उस सर्वाधिक उत्पादन देत आहे. एका उसाचे वजन अंदाजे 4 किलो असते.
या जातीचे पीक कीटक आणि वेगवेगळ्या रोगांना प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या जातीपासून चांगले उत्पादन मिळते.
CO-11015 : ही तमिळनाडूमधील उसाची एक प्रमुख जात आहे. पण या जातीची लागवड संपूर्ण भारतात केली जाऊ शकते असा दावा केला जात आहे.
तुम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या जातीच्या उसाची लागवड करू शकता. त्याचा रंग हलका लालसर जांभळा असतो.
उसाची ही जात विविध रोगास प्रतिकारक असल्याचा दावा केला जातो. टॉप बोअरर, पोका बोअरिंग आणि रेड रॉट अशा रोगास ही जात प्रतिकारक आहे.
CO-13235 : ही जात भारतीय ऊस संशोधन संस्थेने तयार केलेली आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार MS-6847 आणि CO-1148 या ऊस जातींपासून ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे. या जातीपासून देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत असल्याचे म्हटले जात आहे.