Sugarcane Farming : ऊस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड होते. त्याची लागवड राज्यातील अनेक प्रमुख बागायती जिल्ह्यांमध्ये होते. दरम्यान आज आपण राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
खरंतर, उसाच्या पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक असते. कोणत्याही पिकातून जर चांगले विक्रम उत्पादन घ्यायचे असेल तर त्याच्या सुधारित जातीची निवड करावी लागते.
कृषी तज्ञ सांगतात सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. अशा परिस्थितीत आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी सुरू हंगामासाठी सुचवलेल्या काही जातींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सुरू उसाच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे
फुले १४०८२ : ही ऊसाची सुरू हंगामात लागवडीसाठी उपयुक्त जात आहे. या जातीपासून सरासरी १२८.६० मे.टन/हे. एवढे उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जातीचा साखर उतारा हा देखील खूपच चांगला आहे.
या जातीच्या वैशिष्ट्या बाबत बोलायचं झालं तर हा नवीन वाण सुरू हंगामासाठी उत्तम आहे. पाण्याचा ताण सहन करणारा वाण आहे. मध्यम पक्वता उष्ण कटिबंधासाठी शिफारस करण्यात आली आहे अन अधिक ऊस व साखर उत्पादन ही या जातीची प्रमुख विशेषता आहे.
फुले १५०१२ : उसाचा हा असा वाण आहे जो तीनही हंगामांमध्ये लावला जाऊ शकतो. ऊसाचे तीन हंगाम म्हणजेच सुरू, पूर्व आणि अडसाली या तीनही हंगामांमध्ये या जातीची लागवड करता येणे शक्य आहे आणि या तीनही हंगामामधून या जातीपासून चांगले विक्रमी उत्पादन मिळू शकते असे कृषि तज्ञांचे मत आहे.
या जातीपासून हेक्टरी १३० मेट्रिक टन एवढे विक्रमी उत्पादन मिळवता येते. मध्यम पक्वता अधिक ऊस व साखर उतारा, उत्तम खोडवा, पाचट गळून पडणे हे या जातीचे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
को.एम. ९०५७ (फुले ९०५७) : उसाच्या या जातीपासून १३० मॅट्रिक टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळवता येऊ शकते. गुळाचे उत्पादन अधिक मिळते. साखर उतारा चांगला असून उत्पादन तंत्राचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळते.
उसाचे वजन चांगले असून फूट कमी असल्याने जवळ लागवड करावी. गुळाचे उत्पादन अधिक मिळते. या जातीची लागवड केल्या शेतकऱ्यांना नक्कीच चांगला फायदा होणार आहे.