Sugarcane Farming : ऊस हे एक प्रमुख बागायती पीक आहे. या पिकाची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ऊस उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा मोठा बोलबाला आहे. यावरून राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे ऊस पिकावर अर्थकारण अवलंबून असल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी देशातील शास्त्रज्ञांनी ऊसाच्या विविध जाती विकसित केल्या आहेत. उत्तर प्रदेश मधील शास्त्रज्ञांनी देखील उसाची एक नवीन जात विकसित केली आहे.
या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान आता आपण या जातीच्या विशेषता अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
colk-16202 ऊस जातीच्या विशेषता
उत्तर प्रदेश मधील वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांसाठी colk-16202 हा नवीन वाण विकसित केला आहे. हा ऊस वाण भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनौ यांनी विकसित केला आहे.
या जातीमध्ये साखरेचे प्रमाण १७.७६% आहे. हा एक रोग प्रतिरोधक ऊसाचा वाण आहे. या जातीची विशेषता म्हणजे यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे.
या जातीच्या पिक रोगांना फारसे बळी पडत नाही. या जातीचा उस खूपच वजनदार असतो आणि जाडीही चांगली असते. या ऊस जातीच्या सरासरी उत्पादनाबद्दल बोलायच झाले तर ते क्षेत्रानुसार बदलू शकते.
जमिनीचा मगदूर, शेतकऱ्यांचे नियोजन, हवामान इत्यादी घटकांवर या जातीचे ऊस उत्पादन अवलंबून राहते. त्याचे उत्पादन वेगवेगळ्या मातीत आणि वेगवेगळ्या भागात कमी-अधिक प्रमाणात दिसून येते.
मात्र या जातींचे बियाणे अद्याप शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले नाही. मात्र लवकरच याचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने या जातीचे उत्पादन समजू शकणार आहे.
मात्र ही जात येत्या काळात सर्वाधिक उत्पन्न देणारी जात ठरणार असा दावा केला जात आहे. या जातीची एकरी 600 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.