Sugarcane Farming: भारतात उसाची शेती (Sugarcane Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक उसाची (Sugarcane Crop) लागवड केली जाते. ऊसाचे क्षेत्र आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण ऊस या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहे.
अशा परिस्थितीत जाणकार लोक शेतकरी बांधवांना उसाच्या सुधारित जातींची (Sugarcane Variety) शेती करण्याचा सल्ला देतात. जाणकार लोकांच्या मते ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी (Sugarcane grower farmer) उसाच्या सुधारित जातींची (Improved variety of sugarcane) लागवड केल्यास त्यांना दर्जेदार उत्पादन मिळणार आहे सहाजिकच उत्पादन चांगले राहिले तर शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
एवढेच नाही जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी उसाच्या सुधारित जातींची लागवड केल्यास त्यांच्या उत्पादन खर्चात देखील बचत होते. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी उसाच्या एका सुधारित जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
मित्रांनो आज आपण उसाच्या को 86032 या जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी या जातीची लागवड करत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या सुधारित जातीच्या काही विशेषता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
को 86032 ऊसाची एक प्रगत जात
जाणकार लोकांच्या मते, ऊसाची ही एक सुधारित जात आहे. या जातीच्या उसाची लागवड जून ते फेब्रुवारी अखेरपर्यंत केली जाऊ शकते. या जातीचे आडसाली उत्पादन देखील घेतले जाते. जाणकार लोक सांगतात की आडसाली उत्पादनातून 100 टनाहून अधिक उत्पादन या जातीतून मिळवले जात आहे. या उसाची शेती पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत केल्यास शेतकरी बांधवांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळते.
मात्र असे असले तरी या जातीच्या उसात फुटव्यांची संख्या अधिक असते. यामुळे वारंवार ऊस पिकाची अंतर मशागत करावी लागते आणि फुटवे नियंत्रणात ठेवावे लागतात. असे केल्यास शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन मिळते. खरे पाहता या जातीच्या उसापासून 100 टनांपर्यंत उत्पादन घेता येते मात्र असे असले तरी योग्य व्यवस्थापनाचा जोरावरच ते शक्य होणार आहे. नाहीतर या जातीच्या लागवडीतून 20 टन उत्पादन देखील मिळू शकते. शेतकरी बांधवांनी या जातीच्या उसाची लागवड केल्यानंतर योग्य प्रमाणात खतांची मात्रा दिल्यास निश्चितच यातून चांगले उत्पादन मिळणार आहे.