Sugarcane Farming: देशात उसाची शेती (Cultivation Of sugarcane) मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra Sugarcane Farmer) देखील ऊसाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. साखर उत्पादनात यावर्षी महाराष्ट्र राज्याने एक नवीन उच्चांक गाठला आहे.
यामुळे अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सांगितले जात आहे. ऊस हे नगदी पीक (Cash Crop) असल्याने त्याची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. त्यामुळे बागायती भागात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड आता केली जात आहे.
उसाचे पीक (Sugarcane Crop) शेतकरी बांधवांसाठी (Farmer) शाश्वत उत्पन्न (Farmer Income) मिळवून देणारे साधन बनले आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी उसाच्या काही सुधारित जातींची (Sugarcane Variety) माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया उसाच्या तीन सुधारित जाती.
उसाच्या प्रमुख जाती आणि त्यांचे वैशिष्ट्ये
पंत 12221
ऊसाच्या या जातीचे कृषी शास्त्रज्ञांनी मूल्यमापन केले असून, त्यात असे आढळून आले आहे की, ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या जातीपासून चांगले उत्पादन मिळत आहे. या जातीमध्ये उत्तम दर्जाचा रसही मिळू शकतो. ही जात शेतकरी आणि साखर उद्योग दोघांसाठीही चांगली मानली जाते.
पंत 12226
ऊसाची ही एक सुधारित जात आहे. ही जात रोगांशी लढण्यास सक्षम आहे, तसेच त्याची उत्पादन क्षमताही खूप चांगली मानली जाते. ही एक लवकर परिपक्व होणारी जात आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात पाणी साचलेल्या आणि दुष्काळी परिस्थितीतही अधिक आणि चांगले उत्पादन देण्याची क्षमता आहे. या गुणांमुळे ही जात लागवडीसाठी अतिशय चांगली मानली जाते. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी या जातीची मोठ्या प्रमाणात शेती करत असल्याचे चित्र आहे. भारतात या जातीचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
पंत 13224
कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या जातीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकते. ऊसाची ही जात रोगमुक्त असून उच्च उत्पादनासाठी चांगली मानली जाते. या वाणांमुळे शेतकरी बांधवांना पिकाचे अधिक व चांगले उत्पादन मिळू शकते, असे कृषी शास्त्रज्ञांचे मत आहे.