Sugarcane Farming: भारतात ऊस (Sugarcane Crop) हे एक नगदी पीक (cash crop) म्हणून सर्वत्र लावले जाते. उसाची शेती (sugarcane cultivation) आपल्या राज्यात देखील विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील मराठवाडा,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, खानदेश मधील विविध भागात उसाची कमी-अधिक प्रमाणात लागवड बघायला मिळते.
पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याचे जाणकार सांगत असतात. ऊस हे एक हमीचे पीक असल्याने शेतकरी बांधव (farmer) या बागायती पिकांच्या शेतीकडे अलीकडच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वळले असल्याचे चित्र आहे. ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना ऊस पिकातून शाश्वत उत्पन्न (farmer income) दरवर्षी प्राप्त होत असते. मात्र असे असले तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (sugarcane grower farmer) काही बाबींची विशेष काळजी देखील घ्यावी लागते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पिकाचे व्यवस्थापन योग्य तऱ्हेने करावे लागते. जाणकार लोकांच्या मते ऊस पिकावर विविध रोगांचे सावट असते, यामुळे उसाच्या उत्पादनात मोठी घट होते. ऊस पिकावर पोक्का बोंग नावाचा एक भयंकर रोग (sugarcane disease) होत असतो. या रोगामुळे ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते.
अशा परिस्थितीत ऊस पिकासाठी घातक ठरत असलेल्या या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक असते. आज आपण देखील आपल्या ऊस उत्पादक शेतकरी वाचक मित्रांसाठी पोक्का बोंग या रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग शेतकरी मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
उस पिकासाठी घातक ठरणाऱ्या पोक्का बोंग रोगाचे लक्षणे जाणून घ्या बरं…!
पोक्का बोंग रोगाच्या प्रादुर्भाव होण्याच्या अगदी सुरवातीस तिसऱ्या आणि चौथ्या पानांच्या बेचक्यात (पानाच्या व देठाच्या जोडाच्या ठिकाणी) पांढरट पिवळसर पट्टे दिसतात. बाधित झालेल्या उसाची पाने आकसतात, लांबी देखील लक्षणीय कमी होते.
जाणकार लोकांच्या मते, या रोगाची तीव्रता वाढल्यास पोंगा मर किंवा शेंडा कूज दिसून येत असते. या रोगामुळे अनेकदा कांड्यांवर कांडी काप (नाइफ कट) सारखी लक्षणे दिसून येतात.
हा रोग पहिल्या स्टेजमध्ये देखील घातक ठरतो कारण की या रोगाचा प्राथमिक प्रसार हवेमार्फत होतो. दुय्यम प्रसार पाणी, पाऊस व किटकाद्वारे होत असल्याची माहिती जाणकार लोकांकडून दिली जाते. अशा परिस्थितीत या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक बनते.
ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या पोक्का बोंग रोगावर असं नियंत्रण मिळवा बरं….!
जाणकार लोकांच्या मते, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शेतकरी बांधवांनी ऊस लागवड करण्या अगोदर माती परीक्षण करावी आणि उसाला खतांची मात्रा योग्य प्रमाणात योग्य वेळी जाणकार लोकांच्या सल्ल्याने द्यावी.
या रोगाने प्रभावित झालेले शेंडेकुज आणि पांगशा फुटलेले ऊस फडातून बाहेर काढावे आणि शेतापासून दूर जाळून नष्ट करावीत. हा रोग हवेमार्फत, पाण्यामार्फत तसेच किटकामार्फत देखील पसरत असल्याने बाधित झालेला पाऊस शेताबाहेर काढून जाळणे अतिशय महत्त्वाचे राहते.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, कॉपर ऑक्झिक्लोराईड 2 ग्रॅम किंवा कार्बेंन्डाझिम 1 ग्रॅम किंवा मॅंकोझेब 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. सदर फवारणी 10 दिवसांच्या अंतराने करण्याचा सल्ला दिला जातो. जाणकार लोक ही फवारणी करताना शेतकरी बांधवांना स्टीकर वापरण्याचा सल्ला देतात. जाणकार लोकांच्या मते स्टिकर वापरल्यामुळे फवारणी पिकावर व्यवस्थितरीत्या बसते. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी गरजेनुसार 2 ते 3 फवारण्या कराव्यात, असा सल्ला दिला जातो.