Sugarcane Farming: राज्यात उसाची (Sugarcane Crop) लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भारताच्या एकूण ऊस उत्पादनात (Sugarcane Production) महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. गेल्यावर्षी साखर उत्पादनात महाराष्ट्राने एक नवा विक्रम प्रस्थापित करत कर उत्पादनात देशात पहिला क्रमांक पटकावला होता.
यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. खरं पाहता ऊस एक नगदी (Cash Crop) आणि हमीचे पीक म्हणून ओळखले जाते. यामुळे बागायती भागात या पिकाची सर्वाधिक शेती केली जाते. विशेष म्हणजे शेतकरी बांधव (Farmer) या पिकाच्या लागवडीतून चांगला बक्कळ पैसा (Farmer Income) देखील कमवत असतात.
मात्र असे असले तरी ऊस पिकावर नानाविध किडींचे आणि रोगांचे सावट असते. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना (Sugarcane grower farmer) ऊस पिकाचे योग्य व्यवस्थापन (Sugarcane crop management) करून उसासाठी घातक ठरणाऱ्या किटकांचे तसेच रोगाचा वेळीच नायनाट करावा लागतो.
आज आपण ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या मर रोगाची (sugarcane disease) माहिती जाणून घेणार आहोत तसेच मररोग कशा पद्धतीने नियंत्रित केला जाऊ शकतो याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
मर रोगाची लक्षणे:-
जाणकार लोकांच्या मते उसासाठी घातक ठरणाऱ्या मर रोगाचे लक्षणे सुरुवातीचा काही काळ जवळपास उसाची निम्मी वाढ होईपर्यंत दिसत नाहीत. या रोगाचा प्रादुर्भाव झाला की सर्वप्रथम उसाची पाने पिवळी पडतात आणि नंतर शेंड्यापासून वाळतात. म रोगामुळे उसाच्या आत पोकळी बनते यामुळे ऊस वजनात हलका होतो. या रोगाची लागण झाली की उसाची मुळे कुजायला सुरुवात होते आणि लागण झालेला ऊस अगदी अलगत जमिनीतून उपटून येतो. या रोगामुळे ऊस संपूर्ण सुकतो आणि मरतो. या रोगाने ग्रस्त झालेले ऊस आतील बाजूने हलका ते गडद जांभळा किंवा तपकिरी रंगाचा बनतो.
ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या मर रोगावर नियंत्रण कसं मिळवणार बर…!
जाणकार लोकांच्या मते या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी उसाची लागवड करताना नेहमी निरोगी बियाण/बेन लागवडीसाठी वापरावे.
मर रोगाचा उसात प्रादुर्भाव टाळण्यासाठी उसाच्या फडात नेहमीच स्वच्छता असावी.
मर रोगासाठी कोणत्याही औषधाची निर्मिती झालेले नाही. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतात. शेतकरी बांधवांनी लागवड करण्याआधी उसाचे बियाणावर प्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. यासाठी शेतकरी बांधवांनी 0.1% बाविस्टीनच्या द्रावणात दहा मिनिटे उसाचे बेणे बुडवून मग लागवड करावी. शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम बाविस्टीन हे प्रमाण योग्य आहे.