Sugarcane Farming : उसाची शेती महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष म्हणजे या पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे यात शंकाच नाही. मात्र अनेकदा विविध कारणांमुळे उसाच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवता येत नाही. परिणामी ऊस पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाही.
दरम्यान आज आपण जर शेतकऱ्यांनी चुनखडीच्या जमिनीत ऊस लावला असेल तर ऊसाला कोण कोणती खते दिली पाहिजे जेणेकरून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येईल याविषयी कृषी तज्ञांनी दिलेली माहिती अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
चुनखडीच्या जमिनीत उसाची लागवड केल्यास कोणती खते द्याल
महाराष्ट्रात उसाची लागवड पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. उसाचे पीक एक प्रमुख बागायती पीक आहे. या पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज राहते.
त्यामुळे जिथे शाश्वत पाण्याची उपलब्धता आहे अशा भागात उसाची लागवड प्रामुख्याने केली जाते. जिथे चुनखडी ची जमीन आहे तिथे देखील अनेक शेतकरी बांधव उसाची लागवड करतात.
मात्र चुनखडीच्या जमिनीत ऊस लागवड केल्यास शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. पण जर शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी योग्य खत नियोजन केले तर चुनखडीच्या जमिनीतूनही चांगले उत्पादन मिळवता येणार आहे.
शेतकऱ्यांनी अशा जमिनीत ऊस लावला असेल तर चुकूनही सिंगल सुपर फॉस्फेट हे खत वापरायचे नाही. या ऐवजी शेतकऱ्यांनी डीएपीचा वापर केला पाहिजे. पिकाला डीएपी आणि अमोनियम सल्फेट यांचा एकत्रित डोस दिला तर शेतकऱ्यांना आणखी चांगला फायदा मिळवता येतो.
शेतकऱ्यांनी अशा जमिनीत खत व्यवस्थापन करताना युरिया, अमोनियम सल्फेट ही दोन खते आणि सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी डीएपी, एमओपी आणि एसओपी चा वापर केला पाहिजे.
मग पिकासाठी स्फुरद विरघळणारे जीवाणू अडीच लिटर प्रति हेक्टर आणि पालाश विरघळणारे जिवाणू अडीच लिटर प्रति हेक्टर वापरावे, असे केल्यास शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट दिसणार आहे.
अशा पद्धतीचे खत व्यवस्थापन केले तर चुनखडी युक्त जमीन असली तरी सुद्धा शेतकऱ्यांना उसाच्या पिकातून चांगली कमाई होऊ शकणार आहे.
मात्र चुनखडी युक्त जमीन असेल आणि त्या ठिकाणी उसाची शेती केलेली असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर टाळणे आवश्यक राहणार आहे. त्याऐवजी डीएपी या खताचा वापर केला जाऊ शकतो.