Sugarcane Farming : ऊस हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक महत्त्वाचे नगदी पिक आहे. या बागायती पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये लागवड पाहायला मिळते. राज्यासहित देशातील अनेक भागांमध्ये या पिकाची लागवड होते. दरम्यान, आज आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण उसाच्या अशा एका जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याची शेतकऱ्यांनी मार्च किंवा एप्रिल महिन्यात लागवड केल्यास त्यांना चांगले दर्जेदार उत्पादन या ठिकाणी मिळू शकणार आहे.
आज आपण पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पीबी 434 या सुधारित उसाच्या जातीची माहिती पाहणार आहोत.
PB 434 उसाचे सुधारित वाण
पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेले पीबी 434 हे उसाचे एक सुधारित वाण आहे. या जातीची लागवड शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळवून देणार आहे. या जातीच्या उस हा अधिक जाड अन उंच असतो.
यामुळे याचे वजनही अधिक असते. या जातीच्या उसाची लांबी 12 ते 15 फूट पर्यंत असू शकते. या जातीच्या उसाचे पीक विविध रोगांसाठी प्रतिकारक आहे. एवढेच नाही तर विविध कीटकांसाठी देखील उसाचा हा नवीन वाण प्रतिकारक असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलेला आहे.
या जातीच्या ऊस पिकात अधिक फुटवे पाहायला मिळतात. तसेच या जातीपासून अधिक साखरेचा उतारा मिळू शकतो. या जातीच्या उसाची कोणत्याही जमिनीत लागवड होऊ शकते असा दावा केला जात आहे.
या पीबी ४३४ जातीच्या उसाच्या उत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन जातीपासून शेतकऱ्यांना तब्बल ४५० ते ६५० क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.
शेतकऱ्यांनी या जातीच्या ऊसाची मार्च किंवा एप्रिल महिन्यात पेरणी केल्यास त्यांना चांगले उत्पादन मिळु शकणार आहे. सध्याचा हा काळ या जातीच्या लागवडीसाठी उत्तम काळ मानला जात आहे.
निश्चितच या जातीपासून 650 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकणार असल्याचा दावा तज्ञांनी केला असल्याने या जातीची उसाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
तथापि, ऊस पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी योग्य नियोजन देखील करावे लागते. त्यामुळे जर या जातीपासून चांगले दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना मिळवायचे असेल तर पिकाचे योग्य नियोजन त्यांना करावे लागणार आहे.