Sugarcane Farming : तुम्हीही शेतकरी आहात का आणि तुमचा उसाची लागवड करण्याचा प्लॅन आहे का ? मग आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच उपयोगाचा ठरणार आहे. कारण की आज आपण उसाच्या अलीकडेच विकसित झालेल्या अशा एका जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळणार आहे.
भारतीय वैज्ञानिकांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी वेगवेगळ्या उसाच्या जाती विकसित केल्या गेल्या आहेत.
अशातच उत्तर प्रदेश येथील वैज्ञानिकांनी उसाची एक नवीन जात विकसित केली आहे. colk-16202 असे या नव्याने विकसित झालेल्या जातीचे नाव आहे.
दरम्यान आता आपण या नव्याने विकसित झालेल्या उसाच्या जातीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
colk-16202 ऊस जातीच्या विशेषता
भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनौ यांनी ही ऊसाची जात विकसित केली आहे. या जातीमध्ये साखरेचे प्रमाण १७.७६% असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.
हा एक रोग प्रतिरोधक ऊसाचा वाण आहे. या जातीच्या उसात कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही. या जातींचे बेणं पुढील वर्षी उपलब्ध होणार अशी माहिती समोर आली आहे.
या जातीचा ऊस जड व मोठा असतो. यामुळे शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पादन मिळते. कृषी वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की या उसाच्या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 600 क्विंटल पर्यंतचा उतारा मिळू शकतो.
यामुळे या जातीचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल अशी अशा व्यक्त होत आहे.
उसाच्या बाजारात अशा अनेक जाती आहेत यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मात्र अलीकडे काही जातींमध्ये रोगराईचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
मात्र ही नव्याने विकसित झालेली जात अनेक रोगांमध्ये प्रतिकारक असल्याचे आढळले आहे. यामुळे या जातीची लागवड शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरू शकते.