Sugarcane And Maize Rate Will Increase : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. पण याच कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक देखील होत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी राजा भरडला जात आहे ही वास्तविकता कोणापासून लपून राहिलेली नाही.
यामुळे संपूर्ण जगात कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतात शेतकरी आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभाग तर शेतकरी आत्महत्यांसाठी कुख्यात बनला आहे.
मात्र भविष्यात ही परिस्थिती बदलीला आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील अशी आशा आहे. दरम्यान देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ही बातमी ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्रातील सरकारने इथेनॉल उद्योगाला मोठी चालना दिली आहे. केंद्रातील सरकारने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे टार्गेट सेट केले आहे. विशेष म्हणजे हे टार्गेट लवकरच प्राप्त होणार असे दिसत आहे.
कारण की, आतापर्यंत पेट्रोलमध्ये 15% इथेनॉल मिश्रणाचे टारगेट पूर्ण करण्यात सरकारला यश आले आहे. यामुळे येत्या दोन वर्षांनी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष सरकार पूर्ण करेल असे बोलले जात आहे.
हे लक्ष आता जवळपास पूर्ण होत आले असल्याने सरकार डिझेलमध्ये देखील पाच टक्के इथेनॉल मिश्रण करण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक बातमी समोर आली आहे. याबाबतचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
विशेष म्हणजे या प्रस्तावाचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे. यामुळे साहजिकच इथेनॉलच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे. इथेनॉलच्या मागणीमध्ये वाढ झाली तर इथेनॉल ज्या ऊस आणि मक्यापासून तयार होते त्या पिकांना देखील बाजारात चांगला भाव मिळणार आहे.
भारतात इथेनॉल ऊस आणि मका या दोन पिकांपासूनच बनवले जाते. याशिवाय खराब झालेल्या धान्यापासून देखील इथेनॉल ची निर्मिती होते मात्र याचे प्रमाण थोडे कमी आहे. मात्र ऊस आणि मका पिकापासून भारतात मोठ्या प्रमाणात इथेनॉलचे उत्पादन होत आहे.
आता भविष्यात डिझेलमध्ये देखील इथेनॉल वापरले जाणार असल्याने इथेनॉलच्या मागणीमध्ये वाढ होईल आणि याचा फायदा ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.