Successful Women Farmer : अलीकडे शेती व्यवसायात (Farming) शेतकरी बांधवांना (Farmer) नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधव शेतीपासून दुरावत असल्याचे चित्र आहे. एवढेच नाही तर आता शेतकरी पुत्र उच्च शिक्षण घेऊन शेतीऐवजी (Agriculture) नोकरी-व्यवसायास अधिक प्राधान्य देत आहेत.
मात्र या देशात असेही अनेक उच्चशिक्षित आहेत जे उच्च शिक्षणानंतर नोकरी ऐवजी शेतीला प्राधान्य देत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील एका प्रयोगशील महिला शेतकऱ्याने (Women Farmer) देखील उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीऐवजी शेती व्यवसायाला (Farming Business) प्राधान्य दिले आहे. दाभाडी येथील रहिवासी असलेल्या भावना निकम या एक उच्चशिक्षित आणि प्रगतीशील शेतकरी आहेत.
भावना ताईंनी पदवीनंतर नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्राची निवड केली. त्यांनी शेतीचे अनेक प्रगत तंत्र अवलंबले आहे. दाभाडी या गावी त्यांनी दोन हजार स्क्वेअर फुट मध्ये पॉलीहाऊस बांधले आहे. यामध्ये ती सिमला मिरची, टोमॅटो सारख्या अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड करते. तसेच शेडनेट हाऊस मल्चिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, ट्रॅक्टर, रोटाव्हेटरसह अनेक प्रगत शेती तंत्र आणि शेती उपकरणे वापरते. यामुळे त्यांना शेती व्यवसायातून अपेक्षित असे उत्पादन मिळत आहे.
भावना निकम यांचे शेत जैवविविधता मॉडेलचे केंद्र बनले आहे. भाजीपाला आणि इतर पिकांच्या नवीन आणि दुर्मिळ जातींची लागवड हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. अनेक शेतकरी सुधारित बियाणे आणि रोपे घेण्यासाठी त्यांच्या शेतात येतात. ती जलसंधारणावरही काम करत आहे. पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. यासोबतच शेततळेही करण्यात आले आहेत. या तलावांमध्ये ते मत्स्यपालन तसेच कुक्कुटपालन करतात. म्हणजेच शेततळ्यावर एक विशेष रचना करून त्यामध्ये कोंबड्यांचे पालनपोषण केले जाते.
ऍग्रीच्या विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना देतात प्रशिक्षण
भावना निकम यांनी विविध योजनांतर्गत कृषी विज्ञान केंद्र आणि राज्याच्या कृषी विभागाकडून एकात्मिक शेती पद्धती आणि शेतीशी संबंधित इतर उपक्रमांचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या शेतात कृषी-विद्यार्थी, शेतकरी आणि तरुणांची कायमच प्रशिक्षण घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळते. ऍग्रीचे विद्यार्थी तसेच इतर प्रयोगशील शेतकरी त्यांच्याकडे शेती व्यवसायातील बारकावे शिकण्यासाठी येतात. निश्चितच दाभाडी येथील या महिला शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श घालून दिला आहे.
अनेक पुरस्कारांनी झालेत सन्मानित
भावना निकम यांना 2019 मध्ये ‘शिवाजी महाराज कृषी सन्मान पुरस्कार’, ‘सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार’ आणि 2021 मध्ये इनोव्हेटिव्ह वुमन फार्मर पुरस्कार मिळाला. तसेच, तिच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करत आत्माने आयोजित केलेल्या महिला शेतकरी दिनाच्या कार्यक्रमात तिचा गौरव करण्यात आला. निश्चितच भावना ताईंचे शेतीमधलं काम इतरांना प्रेरणा देणार आहे.