Successful Women Farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात बदल करत शेतीतून लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) कमवीत आहेत. काळाच्या ओघात आता महिला देखील शेती व्यवसायात (Farming) पुढे सरसावल्या आहेत.
विशेष म्हणजे महिला शेतकरी शेती व्यवसायात नेत्रदीपक यश संपादन करीत असून पुरुषांना देखील लाजवत आहेत. उत्तर प्रदेश मधील एका महिला शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात शेतीत बदल करत आधुनिकतेची कास धरत फुलशेतीच्या (Floriculture) माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.
उत्तर प्रदेश मधील आरती ही एक महिला शेतकरी आहे, जिने ग्लायडर फ्लोरीकल्चरमधून वेगळे स्थान आणि ओळख निर्माण केली आहे. 26 वर्षीय आरती आणि तिचा पती जितेंद्र यांनी पूर्वी पारंपरिक पद्धतीने गहू, भात, मका, बटाटा आणि लसूण या पिकांची लागवड केली होती, परंतु त्यांना फारसा नफा मिळाला नाही. मग फ्लोरीकल्चरची माहिती घेतली आणि गेली 2 वर्षे फ्लोरिकल्चरच्या अर्थातच फुलशेतीच्या माध्यमातून पूर्वीपेक्षा खूप जास्त कमाई ते करत आहेत.
आरतीने सांगितले की, जेव्हा त्यांनी ही शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांना यापासून खूप परावृत्त केले. मनोबल कमी केले पण तरीही त्यांनी हार मानली नाही. मनात निश्चय केला आणि एका बिघा शेतात ग्लायडर फुलांची लागवड सुरू केली. ज्यासाठी आरती ताईंना सुमारे 20,000 रुपये खर्च आला आणि तेव्हापासून आरती ताई ग्लायडर फुलांची लागवड करत आहे. त्यामुळे त्यांचे उत्पन्न इतर पिकांच्या तुलनेत दुप्पट झाले आहे.
अनेक शहरांमध्ये फुले पाठवतात
ऑक्टोबर महिन्यात ग्लायडरच्या फुलांची लागवड सुरू होते आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फुले येण्यास सुरुवात होते, असे आरतीने सांगितले. त्याचबरोबर लग्नसराईचा मोसम असताना सजावटीसाठी या फुलांची मागणीही वाढते. या फुलांची प्रति कळी आठ रुपयांपासून सुरू होते तर ती 10 रुपये प्रति नग या दराने विकले जाते, ज्यामुळे चांगले उत्पन्न मिळते.
सरकारच्या योजनांचा लाभही आरतीला मिळाला आहे. तिने सांगितले की, त्यांना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत मदत मिळाली आणि त्याद्वारे त्यांनी फुलांची लागवड केली आहे. ही फुले कानपूर, आग्रा आणि दिल्लीसारख्या शहरात आरती पाठवत आहे. काही वेळा ही फुले दिल्लीतून परदेशातही पाठवली जातात, असे त्यांनी सांगितले.
आरतीने सांगितले की, सुरुवातीला जेव्हा त्यांनी ग्लायडर फुलांची लागवड करण्याचा विचार केला तेव्हा त्यांना काही पैशांची गरज होती. त्यावेळी त्यांना बचत गटाकडून काही रक्कम मिळाली आणि त्यांनी स्वतः काही रक्कम गुंतवली. यानंतर फुलशेतीचे काम सुरू झाले, मात्र कोरोनाच्या काळात फुलांची विक्री होऊ शकली नाही, त्यामुळे खूप नुकसान झाले. आज परिस्थिती सामान्य झाली आहे आणि त्यांना आता यातून चांगला लाभ मिळत आहे. एक बिघा जमिनीत फुलशेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत आहे.
आरतीने सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात पुन्हा ग्लायडर फुलांची लागवड करण्यास सुरवात करतील. त्यांना आशा आहे की, यावेळी देखील फुलांचे चांगले उत्पादन होईल, ज्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळेल. फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आरती ताई फुलांच्या बियाण्यांमधूनही नफा कमवत आहेत. सुमारे 10 हजार रुपये प्रति क्विंटल या दराने बियाणे आरती ताई विकत आहेत, त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.