Successful Farmer : महाराष्ट्राला चमत्काराची भूमी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र म्हणजे तपाची त्यागाची बलिदानाची शौर्याची चमत्काराची गाथा सांगणारे राष्ट्र. हिच बाब अधोरेखित केली आहे कलियुगातील एका सावित्रीने.
पुण्याच्या बारामती येथील एका दुर्गा ने आपला पतिव्रता धर्म निभावत कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन शेतीमध्ये (farming) एक अनोखा चमत्कार घडवून आणला आहे. बारामती येथील प्रयोगशील महिला शेतकरी आशा शिवाजीराव खलाटे (success story) यांच्या पतीचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले.
अशा परिस्थितीत पुढे काय होणार? आपल्या पतीला कसं वाचवायचं हा मोठा प्रश्न या पतीवर्ता महाराष्ट्राच्या लेकीला भेडसावत होता. मग काय आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या पतीला स्वतःची मूत्रपिंड दान करत पतीला सती सावित्री प्रमाणे यमाच्या दारातून सुखरूप परत आणले. संसाराचा गाडा आपल्या खांद्यावर घेतला.
कुटुंबाचे एक मात्र उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे शेतीची सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शेतीची जबाबदारी खांद्यावर घेतली एवढेच नाही तर एखाद्या प्रयोगशील शेतकरी (farmer) याप्रमाणे शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करत वेगवेगळ्या पिकांचा शेतीतून या प्रयोगशील महिला शेतकऱ्याने चांगली कमाई देखील करून दाखवली आहे. शेतीला नवसंजीवनी दिल्यानंतर आशा या प्रयोगशील महिला शेतकऱ्याने शेतीला देखील नवसंजीवनी दिली आहे.
त्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करत रंगीत मिरचीचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे रंगीत मिरचीच्या शेतीतून त्यांना लाखो रुपयांची कमाई झाली आहे. यामुळे सध्या या कलियुगी सावित्रीच्या, आशाबाईंच्या सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. आपल्या पतीला जीवनदान देऊन पतीवर्ता धर्म निभावत शेतीमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळे इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी आशा दिशा दाखवत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण कलियुगी सावित्री चा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत.
शेतीची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर आता आपण शेती फक्त पोट भरण्यासाठी करायची नाही असं आशा यांनी ठरवलं. आशाताईंचं सर्व क्षेत्र बागायती आहे. शेतीमध्ये विहीर आहे. आपल्या क्षेत्रात ते आत्तापर्यंत निशिगंध, झेंडू, टोमॅटो, कारली, हिरवी मिरची व उस या पिकांची शेती करत आले आहेत. मात्र या पिकांमध्ये वाढणारा उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांची सांगड कुठेच बसत नव्हती. त्यांना या पिकांसाठी अधिक उत्पादन खर्च करावा लागत होता आणि उत्पन्न मात्र अतिशय तोकडं मिळत होतं. दुष्काळात तेरावा महिना म्हणून त्यांच्याकडे पाण्याची टंचाई देखील प्रकर्षाने जाणवू लागली.
मग काय त्यांनी शेतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या 10 गुंठे शेतजमिनीवर हरितगृहाची पायाभरणी केली. दहा गुंठे हरितगृहात त्यांनी रंगीत मिरचीची लागवड केली. आशाताईंचा हा शेतीमधला डेरिंगबाज प्रयोग यशस्वी ठरला. पहिल्याच वर्षी हरितगृहात लागवड केलेल्या मिरचीच्या पिकातून चांगली कमाई झाली.
यामुळे आत्मविश्वास वाढला. गेल्यावर्षी अजून एका हरितगृहाची उभारणी करण्यात आली. म्हणजेच 20 गुंठे क्षेत्रावर हरितगृहाची उभारणी झाली. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत शेतीची सुरुवात करणाऱ्या आशाताईंचा शेतीमधला प्रवास देखील अडचणींनी भरलेला आहे. मध्यंतरी त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या पिकांना आता पाणी कसे द्यायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढ्यात उभा झाला.
मात्र ज्या सावित्रीने पतीवर्ता धर्मासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली होती ती हार कशी माणणार बरं. आशाताईंनी टँकरच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता केली. सिंचन व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या आधुनिक सिंचन प्रणालीचा अवलंब केला. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आशाताई यशस्वी ठरल्या. आशाताई बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने नवीन पिकांची शेती करण्यास अधिक प्राधान्य देतात. कारण आहे की त्यांनी हरितगृहाची उभारणी केल्यानंतर आपल्या एक एकर शेतजमीनीत थाई पिंक या पेरूच्या जातींची लागवड केली.
शेतीमधील आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांना केवीके आणि कृषी अधिकारी याच नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे. आशाताई यांनी 20 गुंठे क्षेत्रात उत्पादित केलेली रंगीत मिरची जयपुर,दिल्ली, पटना, भोपाळ, मुंबई, पुणे, कुलमनाली या बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. त्यांना रंगीत मिरचीच्या शेतीतून चांगली कमाई होत आहे.
आशाताई तब्बल आठ ते नऊ तास आपल्या शेतात राबतात. एवढेच नाही तर त्यांच्याकडे शेती मधील धडे आत्मसात करण्यासाठी आलेल्या शेतकरी बांधवांना देखील ते प्रशिक्षण देतात. भविष्यात आशाताई यांना वीजटंचाई वर मात करायची आहे. यासाठी आशाताई बायोगॅस प्लांट उभारणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीमध्ये ‘आशा’ यांनी केलेली ही कामगिरी इतरांना ‘दिशा’ दाखवणारी आहे.