Successful Farmer : भारतीय शेतीत (Farming) काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. आता शेतकरी बांधव (Farmer) नवनवीन तंत्रज्ञानाचा (Farming Technology) वापर करून आपले उत्पन्न वाढवत आहेत.
भारतीय शेतीत आता नवीन हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. पॉलीहाऊस (Polyhouse Farming) हे देखील असच एक आधुनिक तंत्रज्ञान आहे.
या शेतीच्या तंत्रज्ञानातून संरक्षित शेती (Farming) केली जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास शेतकरी बांधव पिकानुसार तापमान ठरवू शकतात आणि भाजीपाला, फुलझाडे यांसारखे इत्यादी पिक हंगाम संपल्यानंतर म्हणजेच ऑफ सीजन मध्ये देखील घेऊ शकतात.
या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही हंगामात भाजीपाला फुलझाडे यांसारख्या पिकांची शेती करता येत असल्याने शेतकऱ्यांना चांगली बक्कळ कमाई होते. जयपूरमधील मौजे बासेडी येथील शेतकरी कमलेश चौधरी या प्रयोगशील शेतकऱ्यानं देखील पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) करण्याची किमया साधली आहे.
यामुळे सध्या हा प्रयोगशील शेतकरी चांगलाच चर्चेत आला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की कमलेश दादा यांनी पॉलिहाऊस या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दहा वर्षांपूर्वी सुरू केला. कमलेश दादा आता सलग 10 वर्षांपासून पॉलीहाउसमध्ये काकडीची लागवड (Cucumber Farming) करत आहेत. यामुळे त्यांना भरपूर नफा मिळतं आहे.
मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार कमलेश दादा यांच्या गावाला मिनी इस्रायल म्हणतात कारण त्यांच्या गावातील बहुतांश शेतकरी शेतीमध्ये कायमच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. इजराइल मध्ये ज्याप्रमाणे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी बांधव आपले उत्पादन वाढवतात अगदी त्याच पद्धतीने कमलेश चौधरी यांच्या गावातील शेतकरी देखील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न वाढवत आहेत.
त्यांच्या गावातील बहुतांशी शेतकरी पॉलीहाऊस शेती करत असून यामुळे त्यांना लाखोंची कमाई होत आहे. मित्रांनो आज आपण कमलेश चौधरी यांनी पॉलिहाऊस शेतीतून कशा पद्धतीने आर्थिक प्रगती साधली आहे याविषयी चर्चा करणार आहोत.
कमलेश चौधरी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते 10 वर्षांपासून काकडीची (Cucumber Crop) लागवड करत आहेत. मित्रांनो फक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात असे नव्हे तर ते या सुधारित जातींची लागवड करत असतात. त्यामुळे त्यांचा नफा दुपटीने वाढतो.
कमलेश यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या एक एकर पॉलीहाऊसमध्ये तुर्की आणि नेदरलँड्समधील काकडीच्या वाणांची लागवड केली गेली आहे. हे पीक बियाणे पेरल्यानंतर 40 दिवसांनी तयार होते. काकडीचे रोप 8 फूट उंचीपर्यंत वाढते. एक रोप आपल्या आयुष्यात 7 ते 8 किलो उत्पादन देते. तो एक एकरच्या ग्रीनहाऊसमध्ये 8,000 रोपे लावतो.
प्रत्येक रोपाची 2 फूट अंतरावर लागवड त्यांनी केली आहे. त्यातून 50 ते 70 टन उत्पादन मिळते. ही काकडी तो सरासरी 20 ते 25 रुपये किलो दराने विकतो. कमलेशच्या म्हणण्यानुसार, सरासरी 20 रुपये त्याला बाजार भाव मिळतो अस आपण गृहीत धरलं तर त्याला एका पिकातून 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
यामध्ये 25 टक्के मजूर, 25 टक्के इतर खर्च काढून 5 लाख रुपयांची बचत होते. कमलेश यांनी दिलेल्या माहितीनुसार ते शेतीमध्ये 70 टक्के सेंद्रिय घटक वापरतात. मात्र असे असले तरी, कमलेश चौधरी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांवरचं भर देतात.
काकडी पिकाची काळजी कशी घेतात बर ?
मित्रांनो पॉलीहाऊसचे पडदे उघडे असल्यास बाहेरील कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, यासाठी जाळी ठेवावी. आर्द्रता आणि तापमानावर लक्ष ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, कारण जास्त उष्णता, थंड किंवा आर्द्रता झाडांना नुकसान करू शकते.
जशी आपण स्वतःची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला वनस्पतींचीही काळजी घ्यावी लागते. कमलेश सांगतात की, त्यांना काकडी वाढवण्याचा अनुभव आधीच आहे, परंतु तुर्की आणि नेदरलँड्समधील वाण त्यांनी याआधी वाढवलेले नाहीत.
हा वाण खूप चांगला आहे कारण कमी कालावधीमुळे उत्पादन सुरू होते. सध्या त्यांच्याकडे 9 पॉलीहाऊस आहेत. ते इतर शेतकरी मित्रांना सल्ला देतात की जर त्यांना पॉलिहाऊस शेती सुरू करायची असेल तर काकडी पिकाची शेती करून सुरुवात करणे सुरक्षित राहणार आहे आणि ते 100% परतावा देणार पीक आहे.
कोण-कोणते तंत्रज्ञान वापरतात कमलेश
कमलेश चौधरी सांगतात की, ते सूक्ष्म सिंचन पद्धती, मल्चिंग, हरितगृह, सोलर इत्यादी आधुनिक तंत्रांचा शेतीमध्ये वापर करत असतात. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कमलेश यांना पीक चांगले येते आणि नफाही जास्त मिळतो. निश्चितच कमलेश यांनी आधुनिक शेती शेतकऱ्यांचे कशा पद्धतीने नशीब पालटू शकते हे दाखवून दिले आहे.