Successful Farmer: सध्या देशात दोन वर्ग उदयास येत आहेत. एक वर्ग लाखोंच्या पगारासाठी शहराकडे स्थलांतर करत आहे तर दुसरा वर्ग लाखोंच्या पगारावर तुळशीपत्र देऊन गावाकडे येत शेती (Farming) वं शेती पूरक व्यवसायात (Agri Business) करियर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे हा दुसरा वर्ग पहिल्या वर्गाला वरचढ ठरत आहेत. लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून गावाकडे परतनारे हे नवयुवक शेतीमध्ये आपल्या ज्ञानाचा वापर करत लाखो नव्हे तर करोडो रुपये (Farmer Income) कमावण्याची किमया साधत आहेत.
उत्तराखंड मधील दोन तरुणांनी देखील असच काहीस करून दाखवत इतरांसाठी मार्गदर्शक काम केलं आहे. उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी कमल पांडे आणि नमिता टमटा या दोन दोस्तांनी मशरूम शेतीच्या (Mushroom Farming) माध्यमातून लाखोंची कमाई केली आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की कमल गेल्या दहा वर्षांपासून एका चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत कामाला (Job) होता. त्या ठिकाणी त्याला गळेगठ्ठ पगाराची नोकरी होती. मात्र नोकरीमध्ये मन रमत नसल्याने आणि लहानपणापासून काहीतरी जरा हटके आणि आपल्या राज्यासाठी काम करायचं ठरवलं असल्याने कमल यांनी मशरूम शेतीशी संबंधित स्टार्टअप सुरू केला.
नमिता यांचीदेखील कमल सारखीच कहाणी आहे. खरं पाहता नमिता ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी शिकत होती. मात्र तिलादेखील काहीतरी आपल्या आयुष्यात नवीन बदल घडवायचा असल्याने तिने देखील कमल सोबत मशरूमच्या लागवडीची संबंधित स्टार्टअप मध्ये भाग घेतला आहे.
मित्रांनो नमिता आणि कमल या दोघांनी मशरूमच्या लागवडीशी संबंधित एक स्टार्टअप सुरू केला आहे. याद्वारे ते शेतकरी व महिलांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देत आहेत. दोघांनीही हा स्टार्टअप दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात सुरू केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, अॅग्रो बाबा नावाच्या या स्टार्टअपशी आजच्या घडीला सुमारे 300 लोक जोडले गेले आहेत.
पुरस्कार प्राप्त झाला आहे
मशरूम शेतीशी निगडित सुरु केलेल्या स्टार्टअपमध्ये चांगले नेत्रदीपक यश मिळवले असल्याने कमल पांडे आणि नमिता टमटा यांना स्टार्टअप उत्तराखंड चॅलेंजचा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या कार्याला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळत आहे. कमल यांना ओमानमधील आंतरराष्ट्रीय प्रकल्पासाठी मशरूम लागवड सल्लागार म्हणूनही बोलावण्यात आले आहे.
उत्तराखंडला मशरूम हब बनवणारचं..!
नमिता आणि कमल दोघे मिळून हा मशरूम फार्मिंग स्टार्टअप चालवतात. ते विविध प्रकारच्या मशरूमची लागवड करतात, त्यापैकी औषधी मशरूम सर्वात महत्वाचे आहे. हा एक मशरूम आहे जो फार कमी ठिकाणी आढळतो. त्याची किंमत खूप जास्त आहे.
मात्र, नमिता आणि कमल त्यांना मूळ किमतीत उपलब्ध करून देतात. याशिवाय ते मशरूमचे लोणचे, मशरूम चहा आणि मशरूम मसाला बनवतात. उत्तराखंडला मशरूमचे हब बनवण्याचे या दोन्ही तरुणांचे स्वप्न आहे, जेणेकरून येथील गावांमधून स्थलांतराची समस्या पूर्णपणे संपुष्टात येईल.