Successful Farmer : भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. मित्रांनो मात्र अलीकडे शेतीपासून शेतकरी बांधव (Farmer) दुरावत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मते, शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता अनेक शेतकरी शेती नको रे बाबा असा ओरड करत आहे.
मात्र जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर शेतीमुळे लोकांचे जीवनही बदलू शकते. उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथील रहिवासी कुलदीप बिश्त यांनी असेच काहीसे केले आहे. गाझियाबादमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातून एमबीएची पदवी घेतल्यानंतर कुलदीप यांनी बँकेत (Bank) काही काळ नोकरी केली.
मात्र शेतीच्या आवडीमुळे त्यांनी नोकरी (Job) सोडून मशरूमची शेती (Mushroom Farming) करण्याचा निर्णय घेतला. मग काय कुलदीप यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. मशरूमच्या शेतीमुळे त्यांना लाखोंची कमाई झाली. यामुळे सध्या पंचक्रोशीत या अवलियाची चांगली चर्चा रंगली आहे.
कुलदीपला मिळाली दोस्ताची साथ
कुलदीपच्या या उपक्रमात त्याचा मित्र प्रमोद जुयाल याने साथ दिली. सुरुवातीला दोघांनीही स्वत:च्या ठेवी गुंतवून मशरूमची लागवड सुरू केली. 2015 पासून काम करत असताना, उत्तराखंड फलोत्पादन विभाग आणि स्थानिक मशरूम उत्पादकांकडून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 2017 पासून पूर्णवेळ शेती सुरू केली.
मशरूम पासून बायप्रॉडक्ट बनवले
कुलदीप सांगतात की, सुरुवातीच्या काळात तो दिवसा काम करायचा आणि रात्री शेती करायचा. कुलदीप आज ऑयस्टर, मिल्की आणि बटनसह अनेक प्रजातींच्या मशरूमची लागवड करतो. अधिक नफा मिळविण्यासाठी त्यांनी मशरूमचे बायप्रॉडक्ट बनवण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी तो मशरूमपासून लोणचे, मुरंबा, बिस्किटे आणि ड्राय पावडर असे अनेक पदार्थ बनवत आहे. आगामी काळात नूडल्स आणि मशरूम च्यवनप्राश बनवण्याचा त्यांचा विचार आहे. याशिवाय ते आपल्या गावातील जमिनीत अनेक प्रकारची फळेही घेत आहेत. ‘फंगू’ या ब्रँड नावाने तो बाजारात आपली उत्पादने विकत आहे.
शेतकऱ्यांना मशरूम शेतीचे प्रशिक्षण पण देतात
कुलदीपच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्यांच्या गावातील आणि परिसरातील लोकांना मशरूम लागवडीचे मोफत प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मशरूम उत्पादकांचा गावात एक गट झाला आहे. या शेतकऱ्यांकडून तो मशरूम खरेदी करून बाय प्रॉडक्ट बनवत असून, त्यातून त्याला चांगला नफा मिळत आहे. सध्या त्यांनी 2500 लोकांना प्रशिक्षण दिले आहे.
कुलदीप सांगतात की, ते दर आठवड्याला एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात ज्यामुळे शेतकऱ्यांना मशरूमच्या लागवडीबद्दल जागरूकता येते. त्यासाठी ते प्रतिव्यक्ती दोन हजार रुपये घेतात. याशिवाय ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्रही देतात, जेणेकरून शेतकऱ्यांना नाबार्डसारख्या संस्थांकडून शेतीसाठी निधी किंवा कर्ज मिळू शकेल.
मिळाला बंपर नफा
कुलदीपच्या म्हणण्यानुसार, त्यांना मशरूमच्या व्यवसायातून गेल्या वर्षी 38 लाख रुपयांचा नफा झाला आहे. त्यांची उत्पादने दिल्ली, नागपूरसह देशातील अनेक भागात जातात. मात्र असे असले तरी आता त्यांना आपले बाय प्रॉडक्ट आंतरराष्ट्रीय बाजारातही लॉन्च करायचे आहे.