शेती हा एक व्यवसाय (Farming Business) आहे आणि यामध्ये इतर व्यवसायाप्रमाणे काळाच्या ओघात आमूलाग्र बदल करणे देखील अति महत्त्वाचे ठरते.
व्यवसायात बदल केला नाही तर व्यवसाय डबघाईला येतो यामुळे शेतीमध्ये बदल आवश्यक आहेत. पुणे जिल्ह्यातील (Pune District) वाडा तालुक्याच्या एका अवलिया शेतकऱ्याने देखील शेती व्यवसायात बदल करून चांगले नेत्रदिपक यश मिळवले आहे.
वाडा तालुक्यातील मौजे सांगे येथील नवयुवक शेतकरी गौतम अनिल पाटील यांनी काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा बदल केला.
अनेक अभिनव प्रयोग (Farming Experiment) शेतीमध्ये राबवली. याच प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी या वर्षी सूर्य खरबुजाची शेती यशस्वी करून दाखवली आहे.
गौतम हे शेतीत नवनवीन प्रयोग (Experiments in Agriculture) करत असतात. त्यांचे वडील देखील शेतीमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करायचे.
आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गौतम यांनी देखील शेतीमध्ये बदल करत फळबाग लागवड (Orchard) केली आहे. यासाठी त्यांनी आधुनिक तंत्राचा वापर केला आहे.
त्यांनी केळी, चिकू, केसर, आंबा, पपई इत्यादी फळबागांची लागवड अत्याधुनिक पद्धतीने केली आहे. गत चार वर्षे त्यांनी कलिंगड पिकाची (Watermelon Farming) यशस्वी शेती करून दाखवली आहे.
यामध्ये पिवळ्या रंगाचे कलिंगड देखील त्यांनी उत्पादित करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. आता त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर खरबुजची (Melon Farming) लागवड देखील करून बघितली आहे आणि विशेष म्हणजे खरबूज लागवड त्यांनी यशस्वी देखील केली आहे.
एके दिवशी एका ग्राहकाने फळ खरेदी करताना सूर्य खरबुजाची मागणी केली होती. हे फळ साधारणता नदी किनारी भागात उत्पादित केले जाते.
यामुळे गौतम यांनी पीकपद्धतीत बदल म्हणून आणि एक आव्हान म्हणून या पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रयोग म्हणून अर्धा एकर क्षेत्रावर याची लागवड देखील केली.
सध्या हे पीक चांगले जोमात असून त्यांना चांगल्या उत्पन्नाची देखील आशा आहे. विशेष म्हणजे हे देखील कलिंगड प्रमाणे अल्प कालावधीत काढणीसाठी तयार येत असते केवळ दोन महिन्यात या पिकाची पूर्ण वाढ होत असते.
प्रायोगिक तत्वावर केलेल्या या शेतीतून गौतम यांनी सुमारे सहा टन सूर्य खरबूजचे उत्पादन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
निश्चितच शेतीत काळाच्या ओघात आता बदल महत्त्वाचा होऊ लागला आहे. मात्र यासाठी सुरुवातीला प्रयोग करून यश मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्याची व्याप्ती वाढवणे कधीही चांगले राहील.