Successful Farmer : अलीकडे अनेक तरुण शेती ऐवजी नोकरीला आणि व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. अनेक तरुणांना नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये यश देखील मिळत आहे.
अनेकांना नोकरीत आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसून यामुळे ते आता शेती व्यवसायात आपले नशीब आजमावत आहेत. पुणे जिल्ह्यातील एका शेतीची पार्श्वभूमी असलेल्या तरुणाने देखील सुरुवातीच्या टप्प्यात नोकरी आणि व्यवसाय करून पाहिला.
मात्र नोकरीमध्ये आणि व्यवसायात तोटा सहन करावा लागला असल्याने या नवयुवक तरुणाने पुन्हा एकदा शेतीची कास धरली आणि आता शेतीमधून हा तरुण लाखो रुपयांची कमाई करत आहे.
शिरूर तालुक्यातील मौजे करडे येथील बाळकृष्ण नंदकुमार ठेमेकर हे सुरुवातीला जवळच्याच रांजणगाव एमआयडीसी मध्ये कंत्राटी पद्धतीने कंपनीत काम करत होते. कंपनीमध्ये मात्र खूपच कमी वेतन त्यांना दिलं जात होतं.
हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ एका चुकीमुळे महाराष्ट्रातील 32 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही नमो शेतकरीचा पहिला हप्ता, वाचा सविस्तर
परिणामी त्यांनी कंपनीमधील नोकरी तीन वर्षानंतर सोडली आणि हॉटेल व्यवसायात आपल्या नशीब आजमावलं. हॉटेल व्यवसाय देखील स्पर्धेमुळे आणि महागाईमुळे त्यांना परवडेनासा झाला शेवटी त्यांनी तीन वर्षानंतर हा हॉटेल व्यवसाय देखील बंद केला.
यानंतर त्यांनी शेती व्यवसायात आपलं नशीब आजमावलं. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 20 एकर जमीन होती मात्र यापैकी बहुतांशी जमीन ही पाण्याअभावी पडीक पडलेली होती. उर्वरित जमिनीमध्ये त्यांचे वडील कांदा, हरभरा, गहू अशी पारंपारिक पिके घेत होते.
यापैकी मग दोन एकर जमीनीत त्यांनी सुरुवातीला शेवगा शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आवश्यक बियाणे त्यांनी परिसरातून इतर शेवगा उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतली. मग जमिनीची पूर्व मशागत म्हणून खोलनागरट करण्यात आली आणि शेणखत टाकण्यात आले.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; यंदा कोणत्या नक्षत्रात पडणार अधिक पाऊस अन कोणत्या नक्षत्रात कमी, वाचा याविषयी सविस्तर
यानंतर मग बियाणे लावले आणि ठिबकच्या माध्यमातून पाणी दिले. वेळोवेळी औषधे दिली. झाडे तीन फुटांची वाढल्यानंतर शेंडे खुडलीत. यानंतर तज्ञ लोकांच्या सल्ल्याने वेळोवेळी फवारणी आणि पीक व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या बाबींचे पालन केले.
योग्य व्यवस्थापन केल्यामुळे थोड्याच दिवसात पिकाला शेंगा लागल्या. यातून त्यांना तीन टन माल मिळाला आणि 35 रुपये ते 110 रुपये प्रति किलो पर्यंतचा भाव देखील मिळाला. चांगला बाजार भाव मिळाला असल्याने त्यांना दोन एकरातून दोन लाख 25 हजार पर्यंतची कमाई झाली.
यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला आणि त्यांनी आणखी सात एकर जमिनीत शेवगा लागवडीचा प्रयोग केला. निश्चितच, नोकरी आणि व्यवसायात आलेले अपयश पचवत बाळकृष्ण यांनी शेती व्यवसायात साधलेली ही प्रगती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, आता मल्चिंग पेपर साठी मिळणार 50 टक्के अनुदान; योजनेचे निकष, पात्रता अन अर्ज करण्याची पद्धत; वाचा….