Successful Farmer: भारतात शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करत असतात. उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकांऐवजी आता शेतकरी बांधवानी फळबाग लागवडीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.
खरं पाहता, आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील आता उत्पादनवाढीचे अनुषंगाने फळबाग लागवड करू लागले आहेत. मात्र अजूनही आपल्या राज्यात जांभळाची शेती (Jamun farming) खूपच कमी प्रमाणात बघायला मिळते. मात्र असे असले तरी पुणे जिल्ह्यातील (Pune)एका शेतकऱ्याने जांभूळ शेतीच्या (Agriculture) माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या मौजे राहू येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब शंकर भुजबळ यांनी जांभूळ लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न (Farmer Income) कमवून दाखवले आहे. भुजबळ यांनी खरं पाहता सात वर्षांपूर्वी जांभूळ लागवड केली होती. भुजबळ यांनी लावलेल्या जांभळाच्या पिकातून आता उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे भुजबळ यांनी केलेल्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मित्रांनो आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, बाळासाहेब भुजबळ हे नोकरी करायचे. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर बाळासाहेब यांनी शेतीची आवड असल्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी आपल्या शेतीत जांभळाची बाग लावली. खरं पाहता बाळासाहेब आपल्या शेतीत कायमच नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात. त्यांनी केलेली जांभूळ लागवड हे देखील त्याच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाचाचं एक भाग आहे.
मित्रांनो प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब भुजबळ यांनी 2015 साली आपल्या अडीच एकर शेतात जांभूळ लागवड करण्याचे ठरवले. या अनुषंगाने त्यांनी कृष्णागिरी जातीच्या जांभळाची 250 झाडांची लागवड केली. या वर्षी भुजबळ यांनी लागवड केलेल्या जांभळाच्या झाडांना तब्बल सात वर्षे झाली आहेत. आतापर्यंत भुजबळ यांना जांभळाचे एकूण 5 हंगाम हंगाम सापडले आहेत.
म्हणजेच आतापर्यंत भुजबळ यांनी पाच वेळा जांभूळ शेतीतून उत्पन्न मिळवले आहे. भुजबळ उत्पादित करत असलेल्या जांभळाला प्रति किलो 250 रुपये पर्यंतचा भाव मिळत आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब यांनी जांभूळ शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर केला आहे. यामुळे त्यांना अतिशय कमी उत्पादन खर्च लागतो शिवाय उत्पादन देखील चांगले मिळते. बाळासाहेब यांच्या मते त्यांना जांभूळ शेतीसाठी एकरी 25 हजार रुपयांचा खर्च येतो.
पंचवीस हजार रुपये खर्च केल्यानंतर एकरी चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे. म्हणजेच अडीच एकर क्षेत्रातून त्यांना जांभूळ शेतीतून तब्बल नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. निश्चितच बाळासाहेबांनी शेतीत केलेला हा प्रयोग कौतुकास्पद असून यामुळे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.