Successful Farmer : भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र असे असले तरी आता नवयुवक शेतकरी पुत्र शेती (Farming) पासून दुरावत आहेत. शेतीऐवजी (Agriculture) शेतकरी (Farmer) पुत्र आता नोकरीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
मात्र असे जरी असले तरी देखील देशात असेही अनेक लोक आहेत जे नोकरी (Job) सोडून शेती व्यवसायाकडे वळत आहेत. विशेष म्हणजे शेती व्यवसायात असे लोक दैदिप्यमान कामगिरी करत असून इतरांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
उत्तराखंड राज्यातील बागेश्वर जिल्ह्याच्या चंद्रशेखर पांडे यांची देखील काहीशी अशीच कहाणी आहे. मित्रांनो खरे पाहता चंद्रशेखर पांडे यांचा जन्म उत्तराखंड मधील बागेश्वर जिल्ह्यात झाला. उत्तराखंडमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मुंबई या मायानगरीकडे प्रस्थान केले.
मुंबईत त्यांनी तब्बल 22 वर्ष कंपनीत काम केले. मात्र कंपनीत काम करताना त्यांचे मन काही लागत नव्हते. त्यांना नेहमीच आपल्या जन्मभूमीत राहावेसे वाटे आणि आपल्या भागातील लोकांसाठी काहीतरी जरा हटके करावेसे वाटे. चंद्रशेखर पांडे नेहमीच उत्तराखंडमधून होत असलेल्या स्थलांतराच्या बातम्या वाचत असत. यामुळे त्यांना मोठी पीडा होत असे. आपल्या राज्यातील जनतेसाठी आपण काहीच करू शकत नाही, असे त्यांना वाटतं.
मग काय शेवटी आपल्या राज्यातील लोकांसाठी काहीतरी करायचं असं चंद्रशेखर पांडे यांनी ठरवलं आणि या विचाराने पेटून उठल्या नंतर चंद्रशेखर पांडे यांनी मायानगरीं मुंबईसारखे शहर सोडले. अनेक लोकांचे मायानगरी मुंबईत पाण्याचे आणि तिथे काम करण्याचे तसेच आपल्या स्वप्नाला आकार देण्याचे ध्येय असते. मात्र चंद्रशेखर पांडे यांचे ध्येय इतरांपेक्षा वेगळं होतं आणि म्हणूनच चंद्रशेखर पांडे यांनी मायानगरी सोडली आणि आपल्या गावाकडे आपल्या जन्मभूमीकडे पुन्हा प्रस्थान केले.
मुंबई सोडल्यानंतर चंद्रशेखर पांडे आपल्या संपूर्ण कुटुंबासह आपल्या गावात स्थायिक झाले. आता ते आणि त्यांचे 12 सदस्यांचे कुटुंब एकत्रितपणे सेंद्रिय शेती करत आहेत. चंद्रशेखर सांगतात की, औषध तयार करण्यासाठी ते अश्वगंधा, कॅमोमाइल, लेमनग्रास, लेमनबम, डँडेलियन, रोझमेरी, भूमी आवळा, आवळा, रिठा, हरड, वनतुलसी, रामतुलसी, श्यामा तुळशी यांसारख्या अनेक औषधी वनस्पतींची शेती करतात. या औषधी वनस्पतींमध्ये शुगर, बीपी, रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार, दमा, डोकेदुखी, सर्दी, ताप असे अनेक लहान-मोठे आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत. संपूर्ण उत्तराखंडमधील स्थलांतराची समस्या त्यांना त्यांच्या शेतीच्या माध्यमातून संपवायची आहे.
चंद्रशेखर यांनी सुरू केलेल्या औषधी वनस्पतीच्या शेतीमुळे त्यांच्या गावातील अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे. शिवाय आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी देखील त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत शेतीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गेल्या पाच वर्षात त्यांच्या परिसरात स्थलांतर करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. निश्चितच चंद्रशेखर पांडे यांनी शेतीत केलेला हा बदल इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे आणि त्यांनी शेतीमध्ये केलेले काम निश्चितच अनुकरणीय देखील आहे.