Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे देशातील नवयुवक शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतीपासून दुरावत आहेत तर दुसरीकडे देशात असे अनेक नवयुवक आहेत जे शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत आपल्या अपार कष्टांच्या जोरावर आणि कष्टाला योग्य नियोजनाची सांगड घालत शेतीतून लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमया साधत आहेत.
मध्य प्रदेश मधील एका युवा शेतकऱ्याने (Young Farmer) देखील शेतीमध्ये बदल करत लाखों रुपये उत्पन्न कमवून दाखवले आहे. मध्यप्रदेश राज्यातील (Madhya Pradesh) खरगोन जिल्ह्याच्या मौजे नुरियाखेडी येथील युवा शेतकरी कृष्णपाल सिंग तोमर यांनी लिंबूच्या शेतीतून (Lemon Farming) लाखोंचे उत्पन्न कमवले आहे. खरं पाहता कृष्णपाल हे एक शेतकरी कुटुंबातील आहेत.
दहावीनंतर शिक्षण सोडले आणि शेतीची सर्व जबाबदारी त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. मग काय त्यांनी आपल्या 40 एकर क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच गहू, सोयाबीन आणि मिरचीची लागवड सुरू ठेवली. शेतीतून मिळणारे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत होते. पारंपारिक शेतीतून खर्च भागवणे देखील कठीण होत होते. कर्ज वाढतच गेले. परिस्थिती बदलण्यासाठी कृष्णपाल यांनी बागकाम करण्याचा निर्णय घेतला. मग काय फळबाग लागवड केल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
दहा वर्षापूर्वी कृष्णपाल यांनी पारंपरिक शेतीत सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुषंगाने कृष्णपाल यांनी लिंबूची लागवड करण्याचे ठरवले. कृष्णपाल यांनी दहा वर्षांपूर्वी 180 लिंबूची झाडे लावली. या 180 लिंबूच्या झाडा मधून सद्यस्थितीला कृष्णपाल यांना अडीच लाख रुपयांची कमाई होत आहे.
पारंपरिक पिकांपेक्षा कितीतरी अधिक पटीने लिंबूच्या शेतीतून उत्पन्न मिळत असल्याचा कृष्णपाल यांचा दावा आहे. कृष्णपाल बांधावरच लिंबूची विक्री करत असतात, मात्र कधी लिंबूची बांधावर विक्री झाली नाही तर ते खंडवा या ठिकाणी असलेल्या बाजारात लिंबूची विक्री करतात. कृष्णपाल यांच्या लिंबुला पन्नास रुपये प्रतिकिलो पासून ते तीनशे रुपये प्रति किलोपर्यंतचा बाजार भाव मिळतो.
कृष्णपाल यांना त्यांच्या एका मित्राने लिंबू पिकातून भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी लेंडी खत लेंडीखत लावण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्यांनी लेंडीखत बाजारातून आणले मात्र नंतर गरज वाढू लागल्याने त्यांनी स्वतः बकरी पालन व्यवसाय सुरू केला. आजच्या घडीला त्यांना बकरी पालन व्यवसायातून देखील चांगली कमाई होत असून सद्यस्थितीला त्यांच्याकडे 50 शेळ्या आहेत. कृष्णपाल यांनी सेंद्रिय शेतीचे धडे युट्युब वरून घेतले. युट्युबवर व्हिडिओ बघत कृष्णपाल यांनी सेंद्रीय शेतीकडे आपला मोर्चा वळवला. लिंबूच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने कृष्णपाल यांनी आता दोन एकर क्षेत्रावर लिंबूची बाग फुलवली आहे.
दोन एकरात आणखी एक लिंबू बाग तयार करण्यात आली
कृष्णपाल सिंह म्हणाले की, “बागकामाचा विस्तार करताना मी पेरूची बाग लावली. त्याच्या बांधावर आंब्याची रोपे लावली आहेत. एक एकरात लिंबाच्या उत्पन्नासह यंदा पाच एकरात दुसरी लिंबू बागही तयार केली आहे. या बागेत 400 लिंबाची रोपटी लावली आहेत. पूर्वी आम्ही सोयाबीन आणि गहू पेरायचो, पण आता लिंबूसह हळद पेरतो.”