Successful Farmer : भारतीय शेतीत (Farming) इतर क्षेत्राप्रमाणेच मोठे मूलभूत बदल केले जात आहेत. आता शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा (Farming Technology) वापर वाढला असून पारंपरिक शेती पद्धतीला फाटा दिला जात आहे.
आता नवनवीन पद्धती आणि आपल्या कल्पनांचा योग्य उपयोग करून शेतकरी (Farmer) जंगी नफा (Farmer Income) कमवत आहेत. अशाच एका कल्पनेने दौसा येथील शेतकऱ्याचे नशीब पुरते बदलले आहे. मित्रांनो शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच लाखोंची कमाई करता येणे सहज शक्य आहे. हेच दाखवून दिले आहे दौसा येथील विनेश शर्मा या प्रयोगशील शेतकऱ्याने (Progressive Farmer).
मित्रांनो खरे पाहता विनेश शर्मा 18 हजारावर एका खासगी कंपनीत कामाला (Job) आहेत. मात्र नोकरीतुन मिळणार्या तुटपुंजीं कमाईवर विनेश यांना आपला उदरनिर्वाह भागवणे मुश्कील जात होते. यामुळे विनेश शर्मा यांनी नोकरी सोबतच शेती करण्यास सुरुवात केली. आणि आज काकडीच्या शेतीतून विनेश लाखो रुपये कमवत आहेत.
दौसापासून 30 किमी अंतरावर असलेल्या खवरावजी येथे राहणारे विनेश जयपूरमध्ये एका खासगी कंपनीत काम करत आहेत. त्यांच्या दीड बिघा शेतात पॉली हाऊसमध्ये काकडीच्या लागवडीसोबतच. त्यांनी पहिले काकडीचे पीक (Cucumber Crop) 18 लाख रुपयांना विकले आहे. यातून सुमारे 9 लाख रुपये निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे 4 महिन्यांत त्यांनी काकडीच्या शेतीतून (Cucumber Farming) ही कमाई केली आहे.
वर्क फ्रॉम होममुळे कल्पना सुचली
कोरोनाच्या काळात खाजगी नोकरीत घरून काम करण्याची संधी मिळाली होती. याच काळात विनेश यांना काकडीच्या लागवडीची कल्पना सुचली. 35 वर्षीय विनेशचे संपूर्ण कुटुंब शेती करते. त्यांनी काकडीच्या लागवडीबाबत संशोधन सुरू केले तेव्हा पॉली हाऊसचीही कल्पना सुचली. त्यानंतर यूट्यूबवरून याबाबत माहिती घेतली. मे 2021 मध्ये त्यांनी त्यांच्या दीड बिघा शेतात 30 लाख रुपये खर्चून पॉली हाऊस उभारले.
कॅप्टन स्टार जातीच्या काकडीच्या रोपांची लागवड केली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्यांदाच 70 टन काकडीचे उत्पादन झाले. पहिली कापणी नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 पर्यंत चालली. या काकड्या जयपूर आणि दौसाच्या बाजारात एकूण 18 लाख रुपयांना विकल्या गेल्या. वाहतूक व इतर खर्च वजा जाता प्रथमच सुमारे नऊ लाख रुपयांची बचत झाली. विनेशने सांगितले की आता पुढील उत्पन्नात 25 लाख रुपये कमावण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
खाजगी नोकरीसोबतच शेती देखील केली
विनेश पार्सल निर्यात करणाऱ्या कंपनीत कस्टममध्ये काम करतात. खावरावजी गावातून ते दररोज जयपूर अप-डाऊन करतात. कुटुंबात 7 भाऊ असून सर्वजण शेती व खाजगी नोकरी करतात. शेतात पॉली हाऊस उभारल्यानंतर विनेशचे उत्पन्न वाढले आहे. कुटुंबातील सर्व सदस्य या शेतीमध्ये रस घेत आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे या कुटुंबाला शेतीत रस नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वजण खाजगी नोकरी करू लागले. पण, कोरोनानंतर ते नोकरी आणि शेती दोन्ही करत आहेत.
वर्षातून तीन वेळा उत्पादन घेतात
बारावी पास विनेशने पहिल्या पॉली हाऊससाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काकडीची लागवड सुरू झाली. विनेशने सांगितले की, काकडीचा हंगाम वर्षभर चालतो. त्याला प्रत्येक बाजारपेठेत मागणी आहे. त्याचे उत्पादन वर्षातून तीनदा म्हणजे दर 4 महिन्यांनी उपलब्ध होते. अशा स्थितीत नफाही सतत मिळत राहतो. काकडी उत्पादनातून 35 लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
शेतात 54 लाख लिटर पाणीसाठा, जिल्हाधिकाऱ्यांनी पण केले तोंडभरून कौतुक
एवढेच नाही तर पाण्याअभावी विनेशने शेतात शेततळे देखील तयार केले आहे. या पावसाळ्यात त्यांनी 54 लाख लिटर पाणीसाठा केला आहे. म्हणजेच त्यांच्या शेततळ्यामध्ये जेवढे पाणी आहे ते दोन वर्षे शेतीसाठी वापरले जाऊ शकते. विनेशची शेती मधली ही चमत्कारिक कामगिरी दौसाचे जिल्हाधिकारी कमर चौधरी यांना कळताच त्यांनी लगेचच विनेशचे शेत जवळ केले आणि तेथील सारी व्यवस्था पाहिल्यावर त्यालाही या तरुण शेतकऱ्याचे वेड लागले आहे. कलेक्टर यांनी विनेश यांचे तोंड भरून कौतुक देखील केले आहे.