Successful Farmer: भारतात शेतीमध्ये (Farming) गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधव (Farmer) आता शेती (Agriculture) नको रे बाबा असा ओरड करत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी देशात असे अनेक शेतकरी आहेत जे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आणि मेहनतीच्या जोरावर शेतीमध्ये एक वेगळी छाप सोडत आहेत.
उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याने देखील शेतीत काळाच्या ओघात बदल करत लाखो रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमया साधली आहे. प्रयागराज येथील शेतकऱ्याने पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत केळी या फळबाग पिकाची (Banana Crop) शेती करून चांगले उत्पन्न कमवून दाखवले आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे की, सदाहरित फळ केळीला बाजारात नेहमीच मागणी असते. मागणीमुळे भारतातही त्याचे उत्पादन जास्त आहे.
एकूण उत्पादनात सुमारे 25 टक्के वाटा असलेला भारत केळीचा जगातील आघाडीचा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश देशाच्या केळी उत्पादनात 70 टक्क्यांहून अधिक योगदान देतात. भारतात दरवर्षी सुमारे 2.75 कोटी टन केळीचे उत्पादन होते.
केळी उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, जिथे वर्षाला 12.2 दशलक्ष टन केळीचे उत्पादन होते. केळी लागवडीकडे (Banana Farming) शेतकऱ्यांचा कल सातत्याने वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे केळीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतं आहे.
प्रयागराजचे प्रयोगशील शेतकरी रघु सिंग यांनी केळीच्या शेतीतून कमी शेतजमिनीत चांगले उत्पन्न कमवून दाखवले आहे. गांजा गावात राहणारे रघु सिंग केळीच्या शेतीतून चांगला नफा कमवत आहेत. रघू सिंह आपल्या 32 बिघा जमिनीवर केळीची लागवड करतात. रघु सिंग यांनी केळीच्या शेती बद्दल माहिती देताना सांगितले की, केळीच्या एका रोपातून सरासरी 15 ते 20 किलो उत्पादन मिळते.
केळी पिकाचा दर गुणवत्तेवर अवलंबून असते
केळी बियाण्यांपासून नाही, तर केळीच्या झाडापासून उगवली जाते. त्यांनी प्रति बिघा 960 झाडे लावली असून त्यातून त्यांना प्रति बिघा 70 ते 80 हजार नफा मिळतो. केळी पिकाचा बाजारभाव त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. एका बिघात लागवड केलेल्या मध्यम दर्जाच्या केळीच्या बदल्यात या शेतकऱ्याला 50 हजार रुपये मिळतं उत्पन्न मिळत आहे, तर उत्तम दर्जाच्या केळी पिकापासून 70 ते 80 हजार रुपये नफा मिळतो. त्याचबरोबर केळीची लागवड करताना अनेक गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे. केळी पिकासाठी 35 ते 36 अंश तापमान योग्य असल्याचे शेतकरी नमूद करतात.
पारंपारिक शेतीपेक्षा केळीच्या शेतीतून जास्त नफा
रघू सिंग केळीच्या लागवडीसोबतच वाटाणा आणि गहू पिकवतात. 14 महिन्यांत केळीचे पीक तयार झाल्यानंतर ते त्या जमिनीवर मटारचे पीक घेतात. केळी लागवडीचे अनेक फायदे असल्याचे रघु सिंह सांगतात. केळीची शेती नसेल, तर एकट्या भात आणि गव्हाच्या लागवडीने घर चालवता येत नसल्याचे रघु सिंग यांनी नमूद केले.