Successful Farmer: शेतीमध्ये शेतकरी बांधव (Farmer) आता आधुनिकतेची कास धरत आहेत. काळाच्या ओघात शेतीत बदल करत त्याला योग्य नियोजनाची सांगड घालत शेतकरी बांधव लाखो रुपये उत्पन्न (Farmers Income) कमावण्याची किमया साधत आहेत.
केवळ शेती (Farming) करून शेती व्यवसायात यशस्वी होता येण अशक्य असल्याने आता शेतकरी बांधव शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय करू लागले आहेत. शेतीपूरक व्यवसायात शेतकरी बांधव पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात करत आहेत.
मध्यप्रदेश मधील एका शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल करून लाखो रुपये उत्पन्न कमवून दाखवले आहे. मध्यप्रदेश (Madhyapradesh) मधील शुजालपूर येथील पटलावडा येथील शेतकरी देवेंद्र परमार हे 8वी उत्तीर्ण आहेत.
शिक्षण जरी कमी झाले असले तरी देखील देवेंद्र शेती व्यवसायात नेहमीच वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन सुरू केले आहे. ते एकूण 100 दुभत्या जनावरांचे संगोपन करत आहेत.
शिवाय देवेंद्रने शेतात बायोगॅस प्लांट (Biogas plant) देखील उभारला आहे. यातून मिळणाऱ्या गॅस द्वारे ते आपली वाहने तर चालवत आहेतच शिवाय गांडुळ खत तयार करत आहेत तसेच वीजनिर्मिती देखील करत आहेत. या प्लांटमधून दररोज 70 किलो गॅसची निर्मिती होत आहे. ते सीएनजीच्या स्वरूपात वाहनांमध्ये वापरत आहेत.
तसेच 100 युनिट वीजनिर्मिती होत आहे. गांडुळ खत विकून दिवसाला 3 हजार तर दूध विकून 4 हजार रुपये देवेंद्र कमावत आहेत. अशा प्रकारे एका महिन्यात सुमारे 2.10 लाखांची कमाई होते. अर्थातच वर्षाला सुमारे 25 लाख रुपयांचे उत्पन्न देवेंद्र यांना मिळत आहे.
4 वर्षांपासून रासायनिक खताचा वापर नाही
मित्रांनो देवेंद्र यांच्याकडे 7 बिघे जमीन आहे. या जमिनीत ते गेल्या 4 वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. त्यांच्याकडे 100 दुभती जनावरे आहेत. त्यापासून दररोज 25 क्विंटल शेण गोळा केले जाते. 100 घनमीटर बायोगॅस प्लांटमध्ये स्वयंचलित मशीनद्वारे शेण टाकले जाते. त्यामुळे 100 युनिट म्हणजेच 12 किलोवॅट वीजनिर्मिती होत आहे. शेणाच्या कचऱ्यापासून गांडूळ खत तयार केले जाते. 300 किलो सेंद्रिय खत 10 रुपये किलो दराने विकले जाते. हे खत आजूबाजूच्या गावातील शेतकरीच घेतात.
महिन्याला दोन लाख रुपये कमावतात
देवेंद्र सांगतात की, ते दररोज 3000 रुपयांची सेंद्रिय खते विकतात. म्हणजेच ते एका महिन्यात 90 हजारांचे खत विकत आहेत. स्वत:च्या गोठ्यातून 500 लिटर आणि इतर गावांतून 1500 लिटर दूध गोळा करून सांची दूध संघ भोपाळला विकून दररोज 4000 रुपये उत्पन्न देवेंद्र कमवीत आहे. अतिरिक्त विजेसाठी 5 किलोवॅट क्षमतेचा सोलर पॅनलही बसवण्यात आला आहे.
अशी सुचली कल्पना
त्यांचा दुग्ध व्यवसाय असल्याने त्यांना आजूबाजूच्या गावातून दूध खरेदी करून आणण्यासाठी वाहने, कार, ट्रॅक्टर लागत असते. दूध आणण्यासाठी तसेच विक्रीला पाठवण्यासाठी त्यांना दररोज 3 हजाराचे डिझेल आणि पेट्रोल टाकावे लागत होते. या खर्चाला कंटाळून त्यांनी स्वतःचा गोबर गॅस प्लांट बायोगॅस प्लांट म्हणून जोडला.
बिहारमधील एका अभियंत्याने प्लांट उभारण्यासाठी मदत केली. त्यासाठी 25 लाख खर्च आला. आता प्लांटमधूनच फुग्यात दररोज 70 किलो गॅस तयार होत आहे. तो आता बोलेरो पिकअप, अल्टो कार आणि ट्रॅक्टर आणि बाइक्स सीएनजी इंधनावर चालवत आहे.
अशा प्रकारे सीएनजी गॅस बनवला जातो
देवेंद्र म्हणाले की, 2500 किलो शेणावर चालणाऱ्या बायोगॅस प्लांटमध्ये तयार होणाऱ्या गॅसमध्ये 60 टक्के मिथेन आणि 40 टक्के कार्बन डायऑक्साइड वायू असतो. कार्बन डायऑक्साइड शुद्धीकरणाद्वारे पाणी आणि ऑइलपासून वेगळे केले जाते, ज्यामध्ये पाण्यासह कार्बन डायऑक्साइड पाईपद्वारे बाहेर जातो.
मिथेन वायू दुसऱ्या पाईपमधून फुग्यात प्रवेश करतो. हा गॅस वाहनांमध्ये सीएनजीच्या स्वरूपात कॉम्प्रेसरद्वारे वापरला जातो. डिझेलपेक्षा सरासरी 16 किमी/किलो जास्त मायलेज मिळत असल्याचा देवेंद्र यांचा दावा आहे.
शेती थांबली, गुरांसाठी चारा पेरला
देवेंद्र म्हणाले, त्यांच्याकडे 7 बिघे जमीन आहे. एवढ्या शेतीत ते पारंपारिक पिके घेत नाहीत. या जमिनीत ते दररोज 500 लिटर दूध देणारी 100 दुभती जनावरांना खायला लागणारा चारा लागवड करतात. शेतात रसायनांचा वापर 4 वर्षांपासून बंद आहे. ते सेंद्रिय खतासह चाऱ्याचे उत्पादन घेत आहेत.
स्वयंचलित मशीन सर्व काम करते
गुरांसाठी सुव्यवस्थित शेडमध्ये नाले आणि कॉम्प्रेसर बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे गोमूत्र आणि शेण स्वयंचलित प्लँटमध्ये काही मिनिटांत जाते. गुरांना दिला जाणारा चारा कापण्यापासून ते दूध वाढवण्यासाठी त्यांना दिलेले धान्य बनवण्याचे यंत्रही शेतावर बसवण्यात आले आहे. यामुळे त्यांच्याकडे केवळ 5 मजूर काम करतात.