Successful Farmer: हरियाणा राज्यातील (Hariyana) फतेहाबादच्या मौजे बैजलपूर गावातील एका शेतकऱ्याने नवीन शेती (Farming) तंत्राने आपली नापीक जमीन सुपीक करून दाखवली आहे. जिथे गेल्या काही वर्षांपूर्वी प्रति एकर वार्षिक 20 हजार रुपये देखील मिळत नव्हते.
त्याच शेती जमिनीतून आता दहा लाखांहून अधिक उत्पन्न (Farmers Income) मिळत आहे. बीए पास शेतकरी (Farmer) पवनकुमार सिहाग याने आपल्या वडिलांसोबत अपार कष्ट करून नापीक जमीन सुपीक करून नवा विक्रम केला आहे. शेतकरी पवन कुमार यांनी त्यांच्या आणि वडील विजेंद्र सिहाग यांच्या मालकीच्या साडेदहा एकर जमिनीत गव्हाची (Wheat Farming) पारंपरिक शेती सोडून बागायती शेती सुरु केली.
शेतकऱ्याने सांगितले की, त्यांची साडेदहा एकर जमीन नापीक आणि कोरडवाहू होती. त्यात पाण्याची विशेष व्यवस्था नव्हती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न अत्यल्प होते. त्यामुळे पारंपरिक शेतीतून ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याऐवजी कमकुवत होत होते.
शेतकरी पवन कुमार यांना हिसार विद्यापीठातील शेती कार्यक्रमात फलोत्पादनाशी संबंधित अनेक पट उत्पन्नाची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी त्याच दिवशी पारंपारिक शेती सोडली. वडिल विजेंद्र सिहाग यांच्या आशीर्वादाने शेतकऱ्याने दोन एकरात फळबाग लावली, वर्षभरानंतर बागेतील उत्पन्न मागील पिकांच्या तुलनेत दुप्पट झाले.
30 लोकांना रोजगार
एकेकाळी हा शेतकरी नोकरीसाठी वनवन भटकायचा, आता तो 30 जणांना रोजगार देणारा यशस्वी शेतकरी ठरला आहे. सिहाग सरकारी नोकरीसाठी अनेकवेळा फॉर्म भरायचा आणि निकालाची वाट पाहायचा. पण निकालात रोल नंबर गहाळ झाल्याचे पाहून हताश व्हायचे, पण उद्यान विभागाच्या कार्यक्रमात पवनकुमारचे आयुष्यच बदलून गेले.
जिथे आधी पवन कुमार सरकारी नोकरीसाठी धावपळ करायचा. मात्र आता ते फलोत्पादनाच्या कामात 30 हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. याशिवाय अनेक तात्पुरते कामगार गरजेनुसार बागेत कामासाठी येत राहतात.
फळबागेसह विस्तारित रोपवाटिका व्यवसाय
शेतकरी पवनकुमार सिहाग यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत फळबाग लागवडीबरोबरच रोपवाटिकाही तयार करून दरवर्षी लाखो रोपांची विक्री केली जात आहे. रोपवाटिकेतुन त्यांना सुमारे एक कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे.
शेतकऱ्याने सांगितले की, चालू हंगामासाठी हिसार सफेदा कलमीची दोन लाख रोपे तयार केलेली आहेत. वरील दर्जाच्या रोपाची बाजारातील किंमत सुमारे 80 रुपये प्रति रोप आहे.
दोन लाख रोपांची विक्री झाल्यास त्यांना एक कोटी 60 लाख रुपयेमिळणार आहेत. तर पीचची 60 हजार रोपे तयार करण्यात आली आहेत.
या वनस्पतीची बाजारभावही सुमारे 80 रुपये असून, सुमारे 48 लाख रुपये त्यांना कमाई अपेक्षित आहे. कलमी रोपे तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, असे शेतकरी पवन सिंह यांनी सांगितले.
कारण त्यांच्या रोपवाटिकेतच संपूर्ण रोप तयार होते. तर काही लोक बाहेरून रोपे आणून विकत आहेत. प्रगतीशील शेतकऱ्याने सांगितले की, हिस्सार सफेदा कलमी वनस्पतीची मागणी मोठ्या प्रमाणावर असून शेतकरी सातत्याने जागरूक होऊन फळबाग लागवडीकडे कल वाढवत आहेत.