Successful Farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था शेती क्षेत्रावर अवलंबून असल्याने आपल्या देशाला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जात असते. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीसमवेतचं शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात करत असतात.
खरं पाहता, आपल्या देशात गाईचे (Cow Rearing) तसेच म्हशीचे मोठ्या प्रमाणात पालन (Buffalo Rearing) केले जाते. मात्र कर्नाटक मधील एका अवलियाने गाढव पालन (Donkey rearing) करून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या हा अवलिया पशुपालक शेतकरी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाल येथील पशुपालक शेतकऱ्यांने गाढवाचे पालन सुरु केले आहे.
श्रीनिवास गौडा नामक पशुपालक शेतकऱ्याने गाढवाचे पालन सुरु केले आहे. श्रीनिवास यांच्या मते, गाढव हा एक मेहनती प्राणी आहे मात्र त्याची सध्या दुर्दशा होत आहे शिवाय गाढवाला इतर पशूंच्या तुलनेत खूपच कमी लेखले जाते यामुळे त्यांनी गाढव पालन करण्याचा निश्चय मनाशी केला आणि त्या अनुषंगाने आठ जून रोजी गाढव पालनास सुरुवात केली.
खरं पाहता श्रीनिवास एका मल्टिनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करीत होते. मात्र 2020 मध्ये त्यांनी कंपनीला राजीनामा ठोकला आणि शेती व्यवसायात उतरले. शेती व्यवसायात काही तरी नवीन करण्याच्या दृष्टीने श्रीनिवास यांनी कंपनीची नोकरी सोडली होती. नोकरी सोडल्यानंतर श्रीनिवास यांनी शेती व शेतीपूरक व्यवसाय सुरू केले.
शिवाय कृषी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण आणि चारा विकासासाठी एकात्मिक केंद्र सुरू केले. श्रीनिवास यांनी सुरुवातीला शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन केले. याशिवाय श्रीनिवास यांनी ससे पालन व कडकनाथ कोंबडीचे पालन देखील केली आहे. आता या यादीत त्यांनी गाढवांचा देखील समावेश केला आहे. श्रीनिवास आत्ता गाढव पालन देखील करू लागले आहेत.
सध्या श्रीनिवास वीस गाढवांचे पालन करीत आहेत. जेव्हा त्यांनी गाढव पालन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक लोकांनी त्यांना वेड्यात काढले. अनेकांनी हा व्यवसाय फ्लॉप जाईल असं भाकीत देखील वर्तविले होतं. तर अनेकांनी गाढवाचे पालन सुरु केले म्हणून श्रीनिवास यांची खिल्ली देखील उडवली होती. मात्र निश्चयाचा महामेरू श्रीनिवास यांनी न खचता गाढव पालन यशस्वी करून दाखवले आहे.
विशेष म्हणजे श्रीनिवास यांनी 8 जून रोजी सुरू केलेल्या गाढव पालनातून त्यांना अल्प कालावधीतच लाखों रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. श्रीनिवास आता गाढवाचे दूध पॅकिंग करून विक्री करण्याच्या विचारात आहेत. यासाठी त्यांनी योजनादेखील आखली आहे. विशेष म्हणजे गाढवाचे दूधइतर पशूंच्या दुधापेक्षा अधिक महाग असल्याचा दावा श्रीनिवास यांनी केला आहे.
श्रीनिवास यांच्या मते त्यांच्याकडे गाढवाच्या दुधासाठी सोळा लाखांच्या ऑर्डर देखील आले आहेत. निश्चितच श्रीनिवास यांनी केलेली ही कामगिरी सध्या देशात मोठ्या चर्चेचा विषय तर आहेच शिवाय इतर शेतकऱ्यांना यातून खूप काही शिकण्यासारखे देखील आहे.