Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) काळाच्या ओघात आता शेतीत (Agriculture) मोठा बदल करत आहेत. हा बदल शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा सिद्ध होत असून बळीराजा आता शेतीतून (Farming) लाखोंचे उत्पन्न (Farmer Income) मिळवू लागला आहे.
शेतीत काळाच्या ओघात बदल केला आणि त्याला आधुनिकतेची सांगड घातली तर निश्चितच शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते. गोंदिया जिल्ह्यातील डोंगरगाव येथील एका महिला शेतकऱ्याने देखील हे सिद्ध करून दाखवले आहे.
डोंगरगावच्या प्रगतिशील महिला शेतकरी पल्लवी वैभव गजभिये या महिला शेतकऱ्याने काळाच्या ओघात शेती व्यवसायात बदल करत त्याला आधुनिकतेची सांगड घालत काकडीच्या शेतीतून (Cucumber Farming) तब्बल साडेचार लाख रुपये कमाई करण्याची किमया साधली आहे.
विशेष म्हणजे या महिला शेतकऱ्याने पतीच्या निधनानंतर शेतीमध्ये नावीन्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीत पल्लवी ताईंची चांगलीच चर्चा रंगली आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता पल्लवीताई यांनी विपरीत परिस्थितींचा सामना करत शेती व्यवसायात नेत्रदीपक यश मिळवले आहे.
पल्लवी ताई यांनी काकडीची लागवड करून एकाच हंगामात तब्बल साडेचार लाख रुपयांची कमाई करून दाखवले आहे. यात त्यांना तब्बल पावणेदोन लाख रुपये निव्वळ नफा राहिला आहे. यशस्वी होण्याची जिद्द असेल आणि त्यासाठी कष्ट करण्याची धमक असेल तर शेतीव्यवसायातून देखील लाखोंची कमाई सहज करता येते हे पल्लवीताई यांनी दाखवून दिले आहे.
खरं पाहता गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी भात शेतीवर अवलंबून आहेत. यातील शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण हे भात पिकावर अवलंबून आहे. मात्र डोंगरगाव येथील पल्लवी ताई यांनी भात पिकाला पर्यायी पीक म्हणून काकडी या हंगामी पिकाची लागवड केली.
विशेष म्हणजे कोरोना काळात पतीचे निधन झाल्यानंतर संसाराची सर्व जबाबदारी पल्लवीताई यांच्या खांद्यावर आली. पतीचे छत्र हरपल्यानंतर देखील पल्लवी ताई यांनी न खचता काकडीच्या शेतीतून लाखों रुपये उत्पन्न कमावले आहे. यासाठी पल्लवी ताई यांना कृषी विभागाचे देखील अनमोल सहकार्य लाभले.
तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत योजनांचा लाभ घेत 0.60 हेक्टर क्षेत्रावर काकडीची लागवड केली. काकडी लागवडीसाठी पल्लवीताई यांना तब्बल अडीच लाख रुपये खर्च आला. यात जमिनीची पूर्वमशागत खत बियाणे मल्चिंग पेपर बांबू इत्यादी गोष्टींसाठी आवश्यक खर्चाचा समावेश आहे.
पल्लवी ताई यांना काकडीच्या शेतीतून 36 मेट्रिक टन काकडीचे उत्पादन झाले. काकडीला 12 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. म्हणजेचं या पिकातून पल्लवी ताई यांना जवळपास साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तीन महिन्यातच पल्लवी ताई यांनी काकडीच्या शेतीतून उत्पन्न मिळवले आहे.
काकडीचा चांगल्या वाणाची लागवड केली असल्याने पल्लवी ताई यांना चांगले उत्पन्न मिळाले. निश्चितचं पल्लवी ताई यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.