Successful Farmer : शेतीमध्ये (Farming) जर काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतीतून लाखोंची कमाई (Farmer Income) केली जाऊ शकते. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील रहिवासी असलेल्या अंशुल मिश्राने देखील शेतीमध्ये (Agriculture) बदल करत लाखों रुपये कमवून दाखवले आहेत.
मित्रांनो खरे पाहता अंशुल उच्चशिक्षित आहेत. त्यांनी चेन्नईतून संगणक विज्ञानात बीटेक आणि दिल्लीतून डेटा सायन्स कोर्स केला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना परदेशातून नोकरीची (Job) ऑफर आली पण त्यांनी ती धुडकावून लावली आणि ते आपल्या मायदेशी परतले.
शाहजहानपूरला आल्यानंतर अंशुल मिश्रा यांनी शेतीमध्ये आपले करिअर सुरू केले. त्यांनी ड्रॅगन फ्रूट लागवड (Dragon Fruit Farming) सुरू केली आहे आणि जवळपास 35 लाखांपर्यंत उत्पन्न करून देणाऱ्या ड्रॅगन फ्रुटच्या (dragon fruit crop) शेतीतून चांगली कमाई करत आहेत. मित्रांनो अंशुल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्रातून 1600 रोपे आणून आपल्या ओसाड शेतात लावली. यामुळे त्यांना खर्चाच्या 4 पट अधिक नफा मिळाला आहे.
गावकऱ्यांसाठी अंशुल बनले प्रेरणास्रोत
या कामामुळे अंशुल (Progressive Farmer) त्याच्या गावातील इतर शेतकरी बांधवांसाठी (Farmer) आदर्श ठरले असून पंचक्रोशीत अंशुल मिश्रा यांची सदैव चर्चा रंगलेली असते. चिलौआ गावातील शेतकऱ्यांसाठी देखील अंशुल प्रेरणास्त्रोत बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताला जमिनीवर नेण्यासाठी त्यांनी परदेशात नोकरी करण्याऐवजी 6 महिने स्वावलंबी होण्यासाठी संशोधन केले. इच्छाशक्ती आणि समर्पणामुळे त्यांची मेहनत फळाला आली आहे.
वर्षाला 35 लाखांची कमाई
मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार, अंशुल 2018 मध्ये महाराष्ट्रात सोलापूरला ड्रॅगन फ्रुट शेती साठी आवश्यक प्रशिक्षण घेण्यासाठी आला होता. आपल्या महाराष्ट्रात अंशुल यांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतल्यानंतर अंशुल यांनी आपल्या गावाकडे प्रस्थान केले आणि आपल्या ओसाड शेतात 1600 रोपांची लागवड केली.
या लागवडीतून त्यांना सामान्य पिकापेक्षा चार पट नफा मिळाला असल्याचे अंशुल यांनी नमूद केले आहे. ड्रॅगन फ्रुट च्या शेतीत होणारा फायदा लक्षात घेता अंशुल यांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीचा विस्तार करून 5 एकरात 20 हजार ड्रॅगन रोपांची लागवड केली आहे. सध्या अंशुल घरी बसून वार्षिक 35 लाख रुपये कमवत आहेत.
त्यासाठी पहिल्या वर्षी त्यांना सहपीक शेतीचा अवलंब करावा लागला. 5 एकर ड्रॅगन लागवडीतून वर्षाला सुमारे 35 लाखांची कमाई त्यांना होत आहे. निश्चितचं पारंपरिक पिकांच्या तुलनेत त्यांना होणारी कमाई चार पट अधिक आहे.
शेतकऱ्यांना रोपे पण विकतात बर
अंशुल सांगतात की, तो उत्तर भारतातील 15 राज्यांमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करणारा सर्वात मोठा शेतकरी आहे. ड्रॅगन फ्रुटबरोबरच ते ड्रॅगन फ्रुटची रोपे देखील विकतात. बिहार, मध्य प्रदेश, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये शेतकरी त्यांच्याकडून रोपे घेऊन ड्रॅगन फार्मिंगचा फायदा मिळवत आहेत.
हॉथॉर्न प्रजातीचा ड्रॅगन ही अशी एकमेव वनस्पती आहे. ज्यामध्ये फळ एकदाच येते आणि 35 वर्षे फळे येत राहतात. अंशुल सांगतात की, याला वर्षातून 7 वेळा फळे येतात. दिल्ली मंडीमध्ये ड्रॅगन फ्रूटला जास्त मागणी आहे.