Successful Farmer : भारत हा शेतीप्रधान देश (Agricultural Country) आहे. मात्र असे असले तरी शेतीमध्ये (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता शेतकरी बांधव (Farmer) शेती नको रे बाबा असा ओरड करत असल्याचे चित्र आहे.
आता शेतकरी बांधवांमध्ये शेतीमध्ये (Agriculture) होत असलेले नुकसान लक्षात घेता शेतीऐवजी एखादा छोटा-मोठा व्यवसाय (Business) किंवा नोकरीचं बरी असा समज दिवसेंदिवस दृढ होत असल्याचे दृश्य आहे. मात्र असे असले तरी देशात असेही अनेक शेतकरी बांधव आहेत जे शेतीतून लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) देखील करत आहेत.
शेती व्यवसायात काळाच्या ओघात योग्य ते बदल केले योग्य ते नियोजन केले तर निश्चितच शेतीतून देखील लाखोंची कमाई केली जाऊ शकते. उत्तर प्रदेश मधील झाशी जिल्ह्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील असंच काहीस करून दाखवल आहे. यामुळे सध्या झाशीच्या या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
झांसी जिल्ह्यातील पुष्पेन्द्र यादव यांनी शेतीमध्ये जरा हटके करायचे या अनुषंगाने पीकपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. यादव यांनी पीक पद्धतीत बदल म्हणून औषधी वनस्पती तुळशी पिकाची शेती सुरु केली. तुळशीच्या शेतीतून (Tulsi Farming) पुष्पेन्द्र यांना अवघ्या काही दिवसातच लाखो रुपयांची कमाई झाली आहे यामुळे हा प्रयोगशील शेतकरी सध्या इतरांसाठी प्रेरणा स्रोत बनला आहे.
तुळस शेतीतून शेतकऱ्याने केला चमत्कार
शेतकरी पुष्पेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार, ते गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या शेतात तुळशीची लागवड करत आहेत. ही शेती करून त्यांचे उत्पन्नही सातत्याने वाढत आहे. सध्या त्यांच्या शेतातून तुळशीचे एवढे चांगले उत्पादन मिळाले आहे की, ते आता आयुर्वेदिक कंपन्यांमध्ये तुळशीची चांगल्या दरात विक्री करून नफा कमवत आहेत.
पुष्पेंद्र यादव सांगतात की, कंपनी तुळशी आणि तुळशीपासून बनवलेले पदार्थ जास्त किमतीत विकते, ज्यामुळे त्यांना भरपूर नफा मिळतो. हे पाहता पुष्पेंद्र यादव स्वतःची एक कंपनी उघडण्याचा विचार करत आहेत, ज्यामध्ये ते तुळशीचे पदार्थ बनवू शकतील आणि बाजारात योग्य किमतीत विकू शकतील.
त्यांच्या कंपनीचे संचालक शेतकरी बांधव असतील आणि शेतकरी उत्पादनांना प्रोत्साहन देतील असेही त्यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर कंपनीत काम करणारेही शेतकरी असतील. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रोजगारही मिळेल. ज्याद्वारे तो त्याच्या आर्थिक समस्या सहज सोडवू शकेल.
सरकारच्या मदतीने कंपनी स्थापन करणार
शेतकरी पुष्पेंद्र यादव सांगतात की, ते भारत सरकारच्या मदतीने आपली कंपनी बनवतील. यासाठी तो गुरसराय ब्लॉकमध्ये सरकारच्या एफपीओ योजनेची मदत घेणार आहे, जेणेकरून त्याला स्वत:ची कंपनी स्थापन करता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, झाशीतील बहुतांश शेतकरी आपल्या शेतात तुळशीची लागवड करत आहेत. याच क्रमाने उत्तर प्रदेश सरकारही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर अधिक भर देत आहे. त्यामुळे राज्यात अनेक योजना आल्या आहेत. ज्याचा शेतकरी बांधवांना थेट लाभ मिळत आहे.