Successful Farmer : भारतात काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात सफरचंद पिकाची शेती केली जाते. येथील सफरचंद जगभरात प्रसिद्ध आहेत. येथील सफरचंदांना देशभरात भरपूर मागणी आहे. खरं पाहता पूर्वी भारतातील या तीनच राज्यात सफरचंद (Apple Crop) शेती (Farming) बघायला मिळत असे.
मात्र आता शेतीमध्ये मोठा बदल झाला असून उत्तराखंड, काश्मीर, हिमाचल प्रदेश मध्ये आढळणारे सफरचंद आता मैदानी प्रदेशात देखील वाढू लागले आहे. नवीन तंत्रज्ञान आणि प्रगत वाणांच्या जोरावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील सफरचंदांची लागवड (Apple Farming) केली आहे.
मैदानी भागात सफरचंद शेती करुन महाराष्ट्रातील शेतकरी बांधावानी (Farmer) शेतीमध्ये चमत्कार केले असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील कोल्हापुर जिल्ह्यातील सफरचंद उत्पादक (Apple Grower Farmer) शेतकरी संतोष जाधव, ज्यांनी 2018 साली सफरचंद रोपवाटिका सुरू केली आणि आज महाराष्ट्रात सफरचंदांचा पुरवठा सुनिश्चित करून चांगला नफा (Farmer Income) कमावत आहेत. यामुळे संतोष दादांची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चर्चा रंगली आहे.
या जाती वापरल्या
आधुनिक शेती तंत्र आणि सुधारित जाती आल्याने आता प्रत्येक अवघड काम सोपे झाले आहे. संतोष जाधव हे आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करून सफरचंदाची शेती करत आहेत. संतोष त्याच्या सफरचंदांच्या बागांमध्ये HRMN-99 आणि Dorset Golden Apple या जातीची लागवड करत आहेत. ज्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील कोणत्याही प्रदेशात पिकवता येतात. या जातींची झाडे लावणीनंतर 2 ते 3 वर्षात फळ देण्यास सुरुवात करतात.
दरम्यान, प्रत्येक झाडाला 8 ते 9 किलो फळे येऊ लागतात. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, संतोष जाधव यांच्या बागेत उगवलेले सफरचंद दर्जेदार आणि चवीला देखील उत्कृष्ट आहेत. त्यामुळेच त्यांची सफरचंद महाराष्ट्राच्या बाजारपेठेत लगेच विकली जात आहेत. यामुळे त्यांना चांगला फायदा देखील होत आहे.
नाशिकमध्येही सफरचंदाची लागवड केली जात आहे
जेथे कोल्हापुरचे संतोष जाधव सफरचंदाच्या शेतीतून बाजारातील मागणी पूर्ण करत आहेत. त्याचवेळी याच प्रकारात नाशिकच्या आखतवडे गावातील पिता-पुत्र जोडीने सफरचंदाच्या शेतीतूनही चमत्कार घडवला आहे. खरे तर वडील पंढरीनाथ आणि मुलगा चंद्रकांत यांनी त्यांच्या शेतात द्राक्षे आणि डाळिंबाची लागवड सुरू केली, नंतर सफरचंदाच्या HRMN-19 या सुधारित जातीची माहिती मिळताच त्यांनी 10,000 खर्च करून सफरचंदाची बागायती केली.
हवामानातील अनिश्चितता आणि नुकसान असूनही, पिता-पुत्र जोडीने त्यांच्या पहिल्या प्रयत्नात 460 किलोग्रॅम उत्पादन घेतले आहे. निश्चितच काश्मीरमध्ये आढळणारे सफरचंद आत्ता महाराष्ट्रात देखील वाढविले जात आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव यातून चांगली कमाई देखील करताहेत.