Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करत आहेत. यामुळे शेती व्यवसाय (Agriculture) केवळ आतबट्ट्याचा व्यवसाय आहे असा शेतकरी बांधवांचा मानस झाला आहे. हेच कारण आहे की, आता नवयुवक शेतकरीपुत्र शेतीपासून दुरावत असल्याचे चित्र आहे.
शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे मात्र शेती करू नये असे स्वप्न पाहत असताना नजरेस पडत आहेत. यामुळे या शेतीप्रधान देशात भविष्यात शेतकरी राहतील का? हा मोठा प्रश्न आणि आणि चिंतनाची बाब आता उभी झाली आहे. मात्र असे असले तरी देशात असेही अनेक शेतकरी आहेत जे आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
विशेष म्हणजे शेतीतून लाखों रुपयांची कमाई करत इतर शेतकऱ्यांना शेती व्यवसायात मदत देखील करत आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) एका महिला शेतकऱ्याने (Women Farmer) देखील शेतीमध्ये बदल करत लाखो रुपये उत्पन्न (Farmer income) कमवून दाखवले आहे. शिवाय ही महिला शेतकरी इतरांना मदत देखील करत आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील या महिला शेतकऱ्याचा अनुभवाचा मोठा फायदा होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी महिला शेतकरी कविता प्रवीण जाधव शेतकरी बांधवांसाठी माती परीक्षणाच्या आधारे कोणत्या पिकांची शेती केली पाहिजे तसेच पीक व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी समजावून सांगतात. यामुळे या प्रयोगशील महिला शेतकऱ्याला परिसरातील लोक ‘लेडी प्लांट डॉक्टर’ म्हणजेच वनस्पतींचे डॉक्टर म्हणून संबोधत असतात.
कविताताई शेतकरी बांधवांना मातीचा मागोवा घेत योग्य उपाय सांगत असते. एवढेच नाही तर ही महिला शेतकरी शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठांची कमी दरात उपलब्धता देखील करून देते. यामुळे परिसरातील अनेक महिला शेतकरी त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. कविता ताई कोण आहेत आणि त्या लेडी प्लांट डॉक्टर कशा बनल्या? आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
कोण आहेत बरं या प्रयोगशील महिला शेतकरी..!
कविता यांना अगदी लहानपणापासूनच शेतीची आवड होती. म्हणूनच त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी विषयात पदवी घेतली. तिला तिच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमादरम्यान थेट शेतकऱ्यांसोबत काम करायचे होते. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि स्वतःचे कृषी निविष्ठा पुरवठा केंद्र स्थापन केले.
कविता ताई कृषी निविष्ठा पुरवठा केंद्राद्वारे, शेतकऱ्यांना खालील सेवा पुरवत आहेत:
शेतकऱ्यांना शेतीमाल उपलब्ध करून देणे
शेतकऱ्यांसाठी ग्रंथालय सेवा, ज्यामध्ये स्थानिक भाषेत शेतीशी संबंधित माहितीसाठी मासिक बुलेटिन आणले जाते. त्याची किंमत फक्त 50 रुपये आहे.
शेतकऱ्यांकडून पाणी आणि पर्णाचे नमुने गोळा केली जातात आणि विश्लेषणासाठी कृषी विद्यापीठांकडे पाठवतात आणि प्रयोगशाळेच्या अहवालांच्या आधारे त्यांना सल्ला दिला जातो.
शेताला भेट देऊन तत्काळ सल्ल्यासाठी मोबाईल सॉईल टेस्टिंग किट म्हणजेच माती परीक्षण. माती आणि पाण्याची तपासणी करून शेतकऱ्यांना योग्य खताच्या वापराबाबत माहिती मिळते, जेणेकरून त्यांना चांगले पीक घेता येईल.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारे अनेक बचत गट आणि शेतकरी क्लब स्थापन केले
अलीकडेच त्यांनी कृषी सेवा केंद्राचे दुसरे युनिट स्थापन केले आहे आणि दोन लोकांना नियमितपणे रोजगार देत आहेत. कृषी निविष्ठांची देखभाल, व्यवस्थापन आणि विपणन याबाबत त्या उद्योजकांना आवश्यक सूचनाही देतात. त्यांना कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजनेने (AC&ABC) प्रोत्साहन दिले आणि कृषी विज्ञान केंद्र बबलेश्वर येथून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतल्यानंतर 2005 मध्ये त्यांनी स्वतःचे युनिट सुरू केले.
लाखोची करत आहेत कमाई..!
आज कविता ह्या एक यशस्वी महिला कृषी उद्योजिका आहेत. आजच्या घडीला ते जवळपास 450 शेतकऱ्यांना आपली सेवा देत आहेत. कविताने तिच्या अॅग्री इनपुट सप्लाय सेंटरद्वारे उभारलेल्या अॅग्री मॉलमध्ये अनेक छोटे उद्योजक, महिला शेतकरी आणि शेतकऱ्यांचे गट सामील होऊ इच्छित आहेत. आज त्यांची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपये आहे. येत्या काही काळात शेतकऱ्यांसाठी त्यांच्या स्वत:च्या कृषी निविष्ठा पुरवठा केंद्रात माती आणि पाणी परीक्षणासह प्रशिक्षण शाळा उघडण्याचे त्यांचे ध्येय आहे.