Successful Businessman : हिंदीत एक म्हण आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ! जर काही मोठ काम करायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग करणे अतिशय आवश्यक असते. त्याग केल्याशिवाय या जगात यशस्वी होणे जवळपास अशक्य आहे. मात्र कोणत्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे याची जाणीव असणे आवश्यक आहे.
असो, आज आपण अशा एका अवलिया तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने त्याच्या आयुष्यात काहीतरी मोठे साध्य करण्यासाठी काही गोष्टी सोडण्याची हिंमत दाखवली आहे. या अवलियाने चक्क सात लाख रुपये पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन व्यवसायात उडी घेतली आहे.
विशेष म्हणजे हा अवलिया त्याच्या या हिमतीमुळे 100 कोटीच्या कंपनीचा मालक बनला आहे. या अवलियाने कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ! अस का म्हणतात हे खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला आज दाखवून दिले आहे.
कोण आहे तो अवलिया
आम्ही ज्या डेरिंगबाज तरुणाबाबत बोलत आहोत तो आहे जमशेदपूर येथील अरुणाभ सिन्हा. अरुणाभ यांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मुंबई आयआयटी मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. खरंतर त्यांचे वडील शिक्षक होते, ते मुलांची शिकवणी घेत असत. त्यांची आई उत्तम गृहिणी होती.
खरंतर अरुणाभ अगदी बालपणापासून शिक्षणात चाणाक्ष होता. शिक्षणात हुशार असल्याने त्याने मुंबईतील आयआयटीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. आयआयटीमधून त्याने विज्ञान विषयातून पदव्युत्तर पदवी ग्रहण केली. शिक्षणानंतर त्याने पुण्यातील एका कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र अरुणाभ यांचे नोकरीत चित्त लागेना.
यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरीवर तुळशीपत्र ठेवलं आणि आपल्या करिअरला एक वेगळी दिशा देण्याचे ठरवले. 2011 मध्ये त्यांनी बिजनेस कन्सल्टिंग फर्म सुरू केली. फ्रेंग्लोबल असे याला नाव दिले. यातून त्यांनी परदेशी कंपन्यांना मदत केली.
2015 मध्ये त्यांनी हा व्यवसाय विकला. यानंतर त्यांनी ट्रिबो हॉटेल्स येथे उत्तर भारतातील डायरेक्टर म्हणून काम सुरू केले. हॉटेल व्यवसायात काम करत असताना त्यांना लॉन्ड्री व्यवसायाचे महत्त्व समजले. ही व्यवसायाची कल्पना त्यांना खूप आवडली आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पुन्हा नोकरीवर तुळशीपत्र ठेवलं. त्यांनी 2016 मध्ये दिल्ली एनसीआर मध्ये लॉन्ड्री सेवा देणाऱ्या युक्लीन UClean कंपनीची सुरुवात केली.
राजधानीत सुरू झालेला व्यवसाय आजच्या घडीला शंभर शहरांमध्ये विस्तारला आहे. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कंपनीचे 350 पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत. भारत सोडा नेपाळ आणि बांगलादेश मध्ये देखील त्यांची कंपनी पोहोचली आहे. तेथील ग्राहकांना देखील त्यांच्या कंपनीची सेवा खूपच भोवली आहे. या कंपनीची एक विशेषता म्हणजे लॉन्ड्री मध्ये कपडे धुण्यासाठी किलोने दर आकारले जातात. कपडे धुण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने कंपनीला कॉल केला तर कंपनीचा माणूस सदर व्यक्तीच्या घरी जातो, कपड्यांचे वजन करतो आणि किलो साठी किती चार्ज होतील हे त्या व्यक्तीला कळवले जाते.
विशेष म्हणजे अवघ्या 24 तासात ग्राहकांचे कपडे धुऊन त्यांना पोहचवले जातात. विशेष म्हणजे कपडे धुण्यासाठी त्यांची कंपनी कमीत कमी पाण्याचा वापर करते आणि पर्यावरणाचा ऱ्हास कसा कमी होईल याकडे ते अधिक लक्ष देतात. त्यांनी फक्त पैसाच कमवायचा असे ठरवलेले नाही. ते पर्यावरणाची देखील तेवढीच काळजी घेतात. हेच त्यांचे सामाजिक दायित्व त्यांना आज लॉन्ड्री व्यवसायात त्यांना यशस्वी बनवत आहे.
मात्र हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. या व्यवसायाच्या अगदी सुरुवातीच्याच महिन्यात त्यांच्या एका स्टोअरमध्ये आग लागली होती आणि त्यांना तब्बल 12 लाख रुपये नुकसान त्यावेळी सहन करावे लागले होते.
आता मात्र त्यांचा व्यवसाय शंभर कोटींच्या घरात पोहोचला आहे. एकेकाळी दुसऱ्याच्या कंपनीत काम करणारा हा अवलिया आता 100 कोटीच्या कंपनीचा मालक बनला आहे. निश्चितच अरुणाभ यांची ही यशोगाथा तरुणांसाठी मोठी प्रेरणादायी राहणार आहे यात शंकाच नाही.