Success Story : गेल्या काही दशकांपासून शेतीमध्ये सातत्याने नफा कमी होत चालला आहे. यामुळे अनेक शेतकरी पुत्र आता शेतीपासून दुरावत आहेत. शेतीमध्ये उत्पादन खर्च देखील भरून काढता येणे शेतकऱ्यांना अशक्य बनत असल्याने शेतीऐवजी नोकरी उत्तम असंच आता शेतकरी पुत्र म्हणून लागले आहेत.
मात्र, अनेकजण आता नोकरी ऐवजी शेतीला प्राधान्य देत आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या एका नवयुवकाने देखील नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेती व शेतीपूरक व्यवसायात आपल करिअर घडवल आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालनातून या तरुणाने लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
फलटण तालुक्यातील आसू येथील शेतकरी सचिन ताम्हणे यांनी ही किमया साधली आहे. सचिन ताम्हणे हे एक उच्चशिक्षित तरुण. उच्च शिक्षणानंतर त्यांनी काही काळ नोकरी देखील केली. मात्र नोकरीमध्ये मन रमत नव्हते म्हणून नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. याला मात्र सर्वप्रथम घरच्यांनी विरोध केला.
हे पण वाचा :- उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल; दरात झाली सुधारणा, ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी भाव, आणखी भाव वाढणार? वाचा….
घरच्यांचा विरोध पत्करून मात्र या तरुणाने काहीतरी नवीन करायचे या दृष्टिकोनातून शेती व्यवसायाला सुरुवात केली. शेतीसोबतच पशुपालन सुरू केले. यासाठी त्यांनी गाईचे संगोपन सुरू केले. विशेष म्हणजे गाय पालनातून मिळणारे दूध विक्री करण्याऐवजी त्यांनी दुधावर प्रक्रिया करत तूप तयार करून याची विक्री सुरू केली आहे.
सचिन जवळपास 3350 रुपये प्रति किलोने तुपाची विक्री करत असून महिन्याकाठी 60 ते 85 लिटर तूप त्यांच्या माध्यमातून विकलं जात आहे. सचिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 2016 मध्ये पशुपालन व्यवसायास सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांनी पंजाब मधून साहिवाल जातीच्या आठ गाई आणल्या. आता त्यांच्याकडे लहान-मोठ्या 40 गाई आहेत. पशुपालना सोबतच सचिन यांनी लाकडी तेलाचा घाणा देखील सुरू केला आहे. सचिन सांगतात की, त्यांच्याकडे बैल होते मात्र बैलांना शेतात काम नव्हते.
मग या बैलांचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून लाकडी तेल घाना सुरू केला. सध्या ते 40 ते 45 किलो शेंगदाणा गाळप करून जवळपास 15 किलो तेलाची निर्मिती करतात. या तेलाची ते 440 रुपये प्रति लिटर या दराने विक्री करत आहेत. याशिवाय ते शेण आणि गाईच्या गोमूत्रपासून विविध बाय प्रॉडक्ट बनवतात.
यात साबण, धूप, फेसपॅक, अर्क, दंतमंजन अशा प्रोडक्टचा समावेश असून यातून त्यांना आता चांगली कमाई होत आहे. एकंदरीत, या नवयुवक तरुणाने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याची डेरिंग केली आणि हेच जोखीम त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले आहे.
एकीकडे नवयुवक शेतकरी पुत्र आता शेती व्यवसायाला कंटाळले आहेत तर सचिन सारखे नोकरी करणारे तरुण आता शेतीमध्ये उतरून लाखो रुपयांची कमाई करून इतरांसाठी मार्गदर्शक असं काम करत आहेत. ही कहाणी निश्चितच नवयुवक तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरक राहणार आहे यात शंका नाही.
हे पण वाचा :- Cotton Price : कापूस पंढरीत पांढरं सोन चमकलं ! कापसाला मिळाला ‘इतका’ विक्रमी दर, आणखी भाव वाढणार? पहा….