Success Story: मित्रांनो पावसाळ्यात (Monsoon Season) शेतात (Farming) तसेच रानात जंगलात अनेक प्रकारच्या रानभाज्या स्वतःचं उगवत असतात. या रानभाज्या चवीला अतिशय उत्कृष्ट असल्याने या रानभाज्यांचा भाजी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
ग्रामीण भागात या रानभाज्या सहज उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात रानभाज्यांचे सेवन अधिक केले जाते. मात्र शहरात देखील या रानभाज्यांना मोठी मागणी असते. नाळभाजी (Water Spinach) ही देखील एक प्रमुख रानभाज्यापैकी एक आहे.
भारतात अनेक राज्यात ही रानभाजी बघायला मिळते. आपल्या राज्यातही नाळभाजी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. उत्तर प्रदेशात देखील नाळभाजी मोठ्या प्रमाणात उगवते. येथील हरदोई जिल्ह्यातील तराई प्रदेशात, स्वतःहून उगणारी नाळभाजी ही शेतकऱ्यांच्या (Farmer) उत्पन्नाचा (Farmer Income) एक प्रमुख स्रोत बनत आहे. या नाळभाजीला वॉटर स्पिनॅच असेही म्हणतात. काही शेतकरी याच्या विक्रीतून लाखोंचा नफा कमावत आहेत.
ही भाजी सखल भागात स्वतःच उगवणारी एक हिरवी भाजी आहे. स्थानिक पातळीवर तेथील शेतकरी याला नारी साग म्हणतात. ही एक स्वादिष्ट भाजी आहे जी सॅलड, पकोडे आणि हिरव्या भाज्यांच्या रूपात खाल्ली जाते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि आयर्न सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. गरोदरपणात महिलांसाठी हे चांगले मानले जाते. खडाखेडा, हरदोई येथील रहिवासी शेतकरी कृष्णा यांनी सांगितले की, ते अनेक दिवसांपासून तलाव आणि तराईतून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
मात्र काही वर्षांपासून ते उत्तम शेती म्हणून नाळभाजी लागवड करत आहेत. हिरव्या भाज्यांची शेती हा एक फायदेशीर व्यवहार आहे दिल्लीसह अनेक राज्यांत त्याची मागणी आहे. त्यांची नाळभाजी आग्रा येथे विक्रीसाठी गेली आहे. काही लोकांनी उथळ पाण्यात व्यवसाय म्हणून याची शेती सुरू केली आहे.
हरदोईच्या पिहानी आणि गंगा किनारी कात्री आणि कटियारी भागात, ही भाजी उथळ पाण्यातून काढून मोठ्या बाजारपेठेत विकली जात आहेत, जी खूप फायदेशीर ठरत आहे. त्याची किंमत 50 रुपये किलोपर्यंत आहे. या किमतीत चांगला नफा शेतकऱ्यांना मिळत आहे.
कोणत्याही खर्चाशिवाय लाखोंचा नफा देणारी नाळभाजी आजकाल हरदोईसह देशातील इतर भाजी मार्केटमध्ये विकली जात असल्याचे हरिओम यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा मिळत आहे. आता भाजीपाला खाणारे सामान्य लोकही कोरोनाच्या कालावधीनंतर प्रतिकारशक्तीसाठी हिरव्या रानभाज्यांकडे वळत आहेत. सध्या शेतकरी आणि विक्रेते या दोघांसाठी हा फायद्याचा सौदा आहे.